नांदुरशिकारी शाळेत विद्यार्थ्यांना निरोप 

गोपाळपूर – नेवासा तालुक्‍यातील नांदुरशिकारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्साहात निरोप देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निरोप समारंभ निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रखमाजी लिपने होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे नेवासा तालुका उपाध्यक्ष विलास लिपने, सरपंच गोरक्षनाथ राजमाने, उपसरपंच गोरक्षनाथ लिपने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्‍वनाथ लिपने आदी उपस्थित होते.
रखमाजी लिपने म्हणाले, आपण सर्वांनी आईवडील, गाव व शाळेचे नाव मोठे करण्यासाठी उच्च शिक्षण घ्यावे. उच्च पदावर काम करावे. मुख्याध्यापक दत्तात्रय घुले, सुनीता पाचेगावकर, पंढरीनाथ काशिद, लक्ष्मण गायकवाड, नामदेव धायतडक, अंबादास बोरुडे, आशा माने, गोपाळ राऊत, अंकुश नवले, रवींद्र पवार, सचिन लिपने, सर्जेराव कासारे, संजय खलाटे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋतुजा गवारे हिने केले. सोनाली पवार हिने आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)