नांदवळ धरणात पाणी सोडण्याची शिवसेनेची मागणी

सातारा ः नितीन बानुगडे-पाटील यांना निवेदन देताना संतोष सोळस्कर व शिष्टमंडळ.

संतोष सोळस्कर व शिष्टमंडळ भेटले बानुगडे पाटलांना

पिपोंडे बु।।, दि. 27 (वार्ताहर) – कोरेगाव तालुक्‍यातील उत्तर भागामध्ये संध्या भीषण पाणी टचाई जाणवू लागली आहे. या भागातील नांदवळ येथील धरणात वसना योजनेचे पाणी सोडावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष सोळस्कर यांनी कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्षा नितिन बानगुडे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या भागातील पिपोंडे, सोनके, सोळशी, नायगाव, नांदवळ या गावातील विहरी नांदवळ धरणात आहेत. मात्र, धरणात पाणी नसल्याने सर्व विहिरीनी तळ गाठला असल्याने या गावावर पाण्याचे मोठे संकट आहे. या भागात पावसाने ओढ दिल्याने परिसरातील सर्व ओढे, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागाला वरदायी ठरणाऱ्या वसना प्रकल्पाद्वारे या धरणात पाणी सोडावे व त्याबाबतचे आदेश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला द्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रशांत निकम, वसंत धुमाळ, सुमित चव्हाण, राजेंद्र शिंदे, प्रशांत तावरे, शामराव चव्हाण,श्रीकांत निकम, अविनाश फडतडे, विपुल चव्हाण यांच्या सह्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)