नांगरे पाटलांचे आवाहन, तर गिरीगोसावी यांची कल्पता

चाकण- चाकण शहरात सोमवारी (दि. 30) शांततेत सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले. हे हिंसक वळण काही काळातच भडकल्याने तुफान दगडफेक झाली, त्यानंतर वाहने जाळण्यात आली. त्यामुळे शहरत सायंकाळी जमावबंदी लागू केल्यानंतर भडकलेले चाकण तणावपूर्ण शांततेत झोपले. दरम्यान, पोलीस महानिरीक्षक डॉ. विश्‍वास नांगरे पाटील यांनी थेट आंदोलकांना सामरो जात भावनिक आवाहन केले, तर चाकणला काही काळ निरीक्षक पदावर राहिलेले पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी वापरलेली गावकऱ्यांची जुनी ओळख आणि दोघा अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चाकणच्या जाणकार मंडळींनी भडलेले, पेटलेले आंदोलन शमविलेल्याने या दोघांच्या कामातील कल्पता यानिमित्ताने चाकणकरांना अनुभवयाला मिळाली.
मराठा आरक्षण आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (ता.30) खेडसह चाकण बंद पुकारण्यात आला होता. संतप्त झालेल्या जमावाने पुणे-नाशिक महामार्गावर 100 ते 150 वाहनांची तोडफोड केली तर 25 पेक्षा अधिक वाहना भस्मसात केल्याने त्याचे केवळ सांगडेच शिल्लक राहिले होते. दरम्यान, तळेगाव चौकात जमलेला हजारोंच्या जमवाने अचानक दगडफेक सुरु केली. गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ सुरु केली. काही वेळानंतर पोलीस आले असता, त्यांच्यावर आणि पोलिसांच्या गाड्यांवरही दगडफेक सुरुवात केली. जमावापुढे निभाव लागू न शकल्याने पोलिसांनी देखील काढता पाय घेतला होता.
मोजक्‍या पोलिसांच्या आवाक्‍याबाहेर गेलेली चाकणची जाळपोळ स्थानिकांकडून नव्हे तर बाहेरगावहून आलेल्या आंदोलकांकडून होत असल्याचे, समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी काही जाणकार स्थानिकांना जमवून गावातून फेरी काढल्यानंतर स्थानिकांचा प्रभाव वाढल्याने जाळपोळ शमली. त्यानंतर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विश्‍वास नांगरे पाटील यांनी “मी शिवाजी महाराजांचा भक्त आहे. तुमच्यामध्ये शिवाजी महाराजांचे रक्त आहे. आपल्या तोंडाशी आलेला घास आपल्याला जाऊ द्यायचा नाही. मला तुमचा भाऊ समजा. आपल्याला शांततेने घ्यायचे आहे’ असे भावनिक आवाहन तरुणांना केल्यावर तणाव हळूहळू निवळत गेला, त्यामुळे हिंसक आंदोलन शमविण्याची या दोघांच्या कसब अनेकांनी अनुभवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)