नसरापूरमध्ये बाजारपेठेत कडकडीत बंद

कापूरहोळ- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमधील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत नसरापूरकरांनी बाजारपेठ बंद ठेवून तीव्र निषेध नोंदवला. सकाळपासूनच मराठा क्रांती मोर्चाचे कायरकर्ते हजारोंच्या संख्येने नसरापूर येथे उपस्थित होते. नागरिक उत्स्फूर्तपणे आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून मोर्चात सहभागी झाले होते.मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला. बनेश्‍वर फाटा भैरवनाथ मंदिर ते चेलाडीपर्यंत आणि परत श्रीराम मंदिरापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नसरापूर येथील व्यापाऱ्याननी दुकाने बंद ठेवली होती. “एक मराठा, लाख मराठा’, अशा घोषणा देत आंदोलकांनी आरक्षण मिळण्यासाठीचे निवेदन भोरचे नायब तहसीलदार बाळासाहेब सिरसट आणि राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)