नव्या पुलोदचं अवजड दुखणं

मुंबई : सत्तेत समान वाटा या मुद्यावर शिवसेने ताणून धरले असतानाच राष्ट्रवादी, आणि कॉंग्रेसच्या नेत्यांणी शिवसेनेने भाजपापासून पूण्र फारकत घ्यावी. राज्यात विरोध आणि केंद्रात सत्तेत सहभागी असा दुटप्पी प्रकार चालणार नाहीू,अशीू भूमिका घेतली आहे. त्यामुळे केंद्रातील अवजड उद्योग खात्यावर शिवसेना पाणी सोडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या मंत्रीपदाचा राजिनामा देऊन राज्यातील सत्तेवर हक्क सांगण्याची तयार शिवसेनेने केली असल्याचे शिवसेनेतरील वरीष्ठ सुत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात अवजड उद्योग हे खाते देऊन शिवसेनेची बोळवण केली होती. त्यावेळी शिवसेनेचे अनंत गिते यांनी तो पदभार सांभाळला होता. त्यावेळी अर्थपूर्ण खाते द्या अशी मागणी सेनेने भाजपाकडे केली होती. त्याला उत्तर देताना एक आव्हान म्हणून या खात्याला अर्थ द्या,असे उत्तर सरकारमधील सर्वोच्च नेत्यांनी दिले असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. खरे तर या खात्यापसून शिवसेनेला कोणताही राजकीय बलाण होत नव्हता. त्यामुळे या खात्यावर शिवसेनेची नाराजी होतीच.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिवाळी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात नव्या पुलोद आघाडीची चर्चा सुरू झाली. शिवसेनेनही आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केल्याने नव्या पुलोदचा प्रयोग होणार असल्याच्या शक्‍यतेत वाढ झाली. या पार्श्‍वभूमी शरद पवार हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी सायंकाळी भेट घेतली. त्यातील निर्णयाकडे राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.