नव्या उद्योगांना मदत करण्यासाठी ऍप

आवश्‍यक कायदे, जीएसटी इत्यादीसाठी आवश्‍यक माहिती

मुंबई – भारतातील आघाडीचे प्राप्तिकर परतावे ई-फायलिंग संकेतस्थळ क्‍लिअरटॅक्‍सने स्टार्टअपना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लॉन्च युअर स्टार्टअप सेवा सुरु केली आहे. या अंतर्गत क्‍लिअरटॅक्‍स भारतीय उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्याचसोबतच त्याचे व्यवस्थापन करण्यासंबंधीच्या मूलभूत बाबींबाबत मदत करण्याससाठी सज्ज आहे.

व्यवसाय सुरू करताना नवउद्योजकांना तारेवरची कसरत करावी लागते. याव्यतिरिक्त कायदा व करविषयक कामकाजामुळे ही प्रक्रिया आणखीच अवघड होऊन जाते. क्‍लिअरटॅक्‍स सहयोगी कंपनी असो, खाजगी मर्यादित कंपनी असो वा मालकीहक्काची कंपनी असो 20 दिवसांच्या आत योग्य प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये सहकार्य करते.

स्थापना आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये व्यवसायासंबंधी आवश्‍यक कायद्यांच्या पालनामध्ये मदत करण्यासोबतच ही सेवा जीएसटी नोंदणी व फायलिंग, पात्र सीएच्या मदतीने खाते तपासणी, नियामक व इतर मान्यवता विषयक सेवा अशा अनेक मूल्यवर्धित सेवा देते.

ही सेवा उद्योजकांना सवलतीच्या दरांमध्ये झीरो बॅलन्ससह बॅंकेत खाते उघडणे, वेबसाइट तयार करणे आणि कामाच्या ठिकाणाच्या सुरक्षिततेची खात्री या बाबतीत देखील मदत करते. क्‍लिअरटॅक्‍सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता म्हणाले, लॉन्च युअर स्टार्टअप सेवा एसएमई व स्टार्टअप्सना कायदेविषयक नियमांमध्ये सहाय्यक ठरतील. यामुळे उद्योजक अधिक धोरणात्मक समस्यांवर लक्ष केंद्रित करू शकतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)