नवोदीत वकिलांनी गुरूकडे व्यवसायाचे धडे घेणे आवश्‍यक – न्या. मोडक

पुणे- सध्या तंत्रज्ञानाचे युग सुरू आहे. या युगातही यशस्वी होण्यासाठी नवोदीत वकिलांना गुरूकडे म्हणजेच सिनिअरकडे जावून वकिली व्यवसायाचे धडे घेणे आवश्‍यक आहे, असे मत प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा बार असोसिएशनतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त 50 वर्षांपेक्षा अधिक कालावधी प्रॅक्‍टीस केलेल्या वकिलांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मोडक बोलत होते. त्यावेळी सत्र न्यायाधीश आर.एन.सरदेसाई, सत्र न्यायाधीश दिलीप मुरूमकर, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. रेखा करंडे, सचिव ऍड. संतोस शितोळे, ऍड. लक्ष्मण घुले, खजिनदार ऍड. प्रतापराव मोरे, हिशेब तपासणीस ऍड. सुदाम मुरकुटे, कार्यकारिणी सदस्य ऍड. चेतन औरंगे, ऍड. पंजाबराव जाधव, ऍड. रमेश राठोड यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यायमूर्ती सरदेसाई 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. मोडक यांनी बोलताना यावेळी गुरूचे महत्त्व सांगितले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)