नवी सांगवी येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन

पिंपळे-गुरव – हिंदूंच्या लक्षावधी वर्षांच्या संस्कृतीतील अद्वितीय गुरु-शिष्य परंपरेचा, कृतज्ञतेचा गुरुपौर्णिमा महोत्सव जनजागृती समिती आणि धर्मसभा न्यासच्या वतीने नवी सांगवी येथे साजरा केला जाणार आहे. राष्ट्र आणि धर्म संकटात असताना सुव्यवस्था निर्माण करण्याचे महत्‌कार्य गुरु-शिष्यांनी केल्याचा गौरवशाली इतिहास भारताला लाभला आहे, अशी संस्थेने माहिती दिली. याच परंपरेद्वारे तात्कालीन सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले आणि आदर्श अशा धर्माधिष्ठित राज्य व्यवस्थेची स्थापना केली. या परंपरेविषयी गुरुपौर्णिमेच्या दिवशी कृतज्ञता व्यक्‍त करणे अनादी काळापासून चालू आहे. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, अन्य समविचारी संघटनांसह यंदा देशभरात 109 ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. 27 जुलै 2018 ला सायंकाळी साडे पाच वाजता गणेश मंगल कार्यालय, एच.डी.एफ.सी. बॅंकेजवळ, कवडेनगर, नवी सांगवी, पुणे येथे गुरुपौर्णिमा महोत्सव होणार आहे. सर्व राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदूंनी सहकुटुंब उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. महोत्सवात आपत्काळात समाज सहाय्यासाठी आवश्‍यक प्रथमोपचार प्रात्यक्षिके आणि बचाव व स्व-संरक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)