नवीन डाळिंब यार्डातील जागा वाटप तिढा सुटणार?

आडते आज घेणार प्रशासकांची भेट

पुणे – मार्केटयार्डात वाढत्या व्यापाऱ्यामुळे नवीन डाळिंब यार्ड उभारण्यात येत आहे. हा यार्ड कॉमन सेल हॉल करत सर्व आडत्यांना समान जागा द्यावी, असा प्रस्ताव आडते असोसिएशनने बाजार समितीकडे दिला आहे. मात्र, तर बाजार समिती प्रशासनाचा आवकेनुसार जागा वाटप करण्याचा विचार आहे. याचा पूर्वीपासून डाळिंब व्यापार करणाऱ्यांना फटका बसणार असण्याची चर्चा बाजार घटकांमध्ये आहे. याबाबत आडते बाजार समितीची प्रशासकांची सोमवारी बैठक घेणार आहेत. यामध्ये हा जागा वाटपाचा तिढा सुटणार का, याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डाळिंबाचा वाढता व्यापार लक्षात गेल्या काही वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेने गेट क्रमांक-4 लगत सुमारे 30 गुंठे मोकळ्या जागेत डाळिंब यार्ड उभारले. आजपर्यंत त्यात थोडेच आडते डाळिंबाचा व्यापार करीत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून फळबाजारातील इतर आडत्यांकडेही डाळिंबाची आवक वाढल्याने त्यांनाही अतिरिक्त जागेची आवश्‍यकता होती. मागील चार-पाच वर्षांपासून संबंधित डाळिंबाचे व्यापारी अतिरिक्त जागेची मागणी करीत होते. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आता जागेची खूपच गरज वाटू लागल्याने बाजार समितीने डाळिंब व्यापाऱ्यांसाठी जनावरांच्या बाजारामागील मोकळ्या जागेत डाळिंब यार्ड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन यार्डात जागा वाटपासाठी आवकेनुसार जागा या निकषणाने जागा वाटपाची योजना प्रशासकांची आहे. मात्र, जागा वाटून दिल्यास संबंधित व्यापारी स्वतःचे ऑफिस, शौचालये बांधून मक्तेदारी करण्याची शक्‍यता आहे. जे की पूर्वीच्या डाळिंब यार्डात झाले होते. त्यामुळे जागावाटपात दुजाभाव न करता डाळिंब यार्ड कॉमन सेल हॉल करून सर्वांना समान जागा देण्याचा प्रस्ताव आडते असोसिएशनने समितीला दिला आहे.

नवीन डाळिंब यार्डात सर्व आडत्यांना समान जागा देत कॉमन सेल हॉलमध्ये व्यापार करण्याची संकल्पना आडत्यांनी सर्वसाधरण सभेत मांडली होती. त्यास अनेक आडत्यांनी सहमती दर्शविली असून त्याबाबतचा प्रस्ताव बाजार समितीला दिला आहे. याविषयी समितीने सोमवारी चर्चेसाठी बोलविले आहे. असाच प्रस्ताव कांदा बाजारासाठीही दिला आहे.
-विलास भुजबळ, अध्यक्ष, आडते असोसिएशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)