नवीन घरासाठी पैशासाठी विवाहितेचा छळ

पिंपरी  – नवीन फ्लॅटसाठी पैसे आनण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला असून याप्रकरणी पति विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृता राकेश ओझा (वय.27 रा. निगडी)यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पती राकेश प्रसाद ओझा (वय.28 रा. निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर 2017 ते 29 जुलै 2018 या कालवधीत अमृता यांचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. अमृता यांचा नुकताच राकेश याच्याशी विवाह झाला होता. मात्र नवीन घर घेण्यासाठी माहेरुन पैसे आण म्हणत तसेच चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केला. तसेच तिचे 1 लाख 89 हजार रुपयांचे दागीने ही घेतले व अमृता यांना नोकरीस जाण्यासही अडवले. छळ असह्या झाल्यानतर त्यांनी पोलिसमध्ये धाव घेतली. अद्याप आरोपी अटक केले नसून निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)