नवा भूजल कायदा 2018 सर्वंकष हवा संस्था आणि कार्यकर्त्यांची मागणी

पुणे, दि.29-नैसर्गिक जलस्त्रोत संरक्षित करण्याचा नवा भूजल कायदा-2018 हा सर्वंकष हवा. त्यात नागरिक, संस्था, कार्यकर्ते यांनी मांडलेली मते सरकारने विचारात घ्यावीत, अशी मागणी या संदर्भात कार्य करणाऱ्या संस्थांनी पत्रकार परिषदेत केली.

जलदेवता सेवा अभियानचे शैलेंद्र पटेल आणि “रामनदी स्वच्छता अभियान’, “जिवित नदी अभियान’, भूजल अभियान’ यांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केली आहे. नव्या कायद्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. संस्था नागरिक आणि तज्ज्ञांच्या सूचना मागवल्या आहेत. रविवारपर्यंत (30 सप्टेंबर) त्याची अंतिम मुदत आहे. आम्ही आमच्या सूचना सरकारल्या कळवल्या आहेत. याबाबत राज्य सरकारची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असेही या प्रतिनिधींनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवा कायदा हा सक्षम, परिपूर्ण आणि सर्वंकष असावा आणि लोकसहभागाच्या दृष्टीने सुलभ असावा. आताच एखादा जलस्त्रोत वाचवायचा झाल्यास सरकारी यंत्रणांकडून त्याचे नकाशे, नोंदी, कागद मिळत नाहीत. जलस्त्रोत वाचवण्याचा प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नाही. रामनदी, बावधन झरा, नाशिक, आळंदी येथील कुंडातील जलस्त्रोत पुनरुज्जीवित करताना आलेल्या अडचणींची माहिती यावेळी देण्यात आली. सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार हा “आंतरराष्ट्रीय नदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जलस्त्रोत वाचवण्यात यावेत, असे आवाहन या संस्थांतर्फे मुळा, मुठा आणि राम नदीवर एक दिवस उपोषण करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी नऊ ते पाच या कालावधीत हे उपोषण करणार असल्याचे संस्थांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)