नवाज शरीफ यांच्यानंतर ख्वाजा आसिफ देखील अपात्र

इस्लामाबाद  : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यानंतर आता तेथील विदेशमंत्री ख्वाजा आसिफ यांना देखील इस्लामाबाद उच्च न्यायालयाने संसद सदस्यत्वाप्रकरणी अपात्र घोषित केले. न्यायालयाने आसिफ यांना पाकिस्तानी घटनेचे कलम 62 आणि 63 अंतर्गत दोषी ठरवले. उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय विशेष खंडपीठाकडून हा निर्णय देण्यात आला.

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे याचिकाकर्ते उस्मान डार यांनी मागील वर्षी आसिफ यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. संयुक्त अरब अमिरातचा कामकाज परवाना बाळगल्याप्रकरणी आसिफ यांना अपात्र ठरविण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. 2013 च्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात आसिफ यांनी संयुक्त अरब अमिरातच्या या परवान्याची बाब नमूद केली नव्हती, तसेच त्यांनी विदेशातील स्वतःची नोकरी देखील चालूच ठेवली होती असा दावा उस्मान यांनी केला. 2013 मध्ये डार यांना आसिफ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. या अगोदर पनामा पेपर्स प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पक्षप्रमुख आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना निवडणूक प्रक्रियेसाठी अपात्र ठरविले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)