नवाजुद्दीन सिद्दीकीची टॉलिवूडमध्ये एंट्री

नेटफ्लिक्सवरील ‘सॅक्रेड गेम्स’मधील भूमिकेच्या प्रचंड यशानंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकी टॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘थलायवर १६५’  चित्रपटातून तो तामिळ इंडस्ट्रीत डेब्यू करणार आहे. नवाजुद्दीनसोबत सुपरस्टार रजनीकांतही दिसणार आहेत. यासंदर्भातील माहिती त्याने इंस्टाग्रामवरून दिली.

नवाजुद्दीन सिद्दीकीने एक पोस्ट लिहीत फोटो शेअर केला आहे. यामध्ये नवाजुद्दीन लिहले कि, “#’थलायवर १६५’ तामिळ चित्रपटासाठी रिहर्सल करत असून सुपरस्टार ‘थलायवा’सोबत काम करण्याचा आनंद होत आहे.” सोबत एक स्क्रिप्ट घेऊन वाचतानाचा फोटो शेअर केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘थलायवर १६५’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, रजनीकांत यांच्यासह विजय सेतूपती, बॉबी सिम्हा, सिमरन, सनथ रेड्डी, मुनिक्षनाथ, मेघ आकाश, दीपक रमेश यासारखे कलाकार झळकणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक सुब्बाराज करत आहेत.

दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीचा आताच रिलीज झालेल्या ‘जिनियस’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० कोटींचा गल्ला जमविला आहे. तर नवाजुद्दीनची मध्यवर्ती भूमिका असणारा आगामी उर्दू लेखक सदात हसन मंटो यांच्यावर आधारित ‘मंटो’ चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)