नववा ‘गोवा राज्य चित्रपट महोत्सव’ 3 ते 6 मे रोजी रंगणार

नववा ‘गोवा राज्य चित्रपट महोत्सव ‘ 3 ते 6 मे रोजी पार पडणार आहे. यंदाच्या महोत्सवात 9 कोकणी आणि एका मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी महोत्सवाची घोषणा केली.

महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजता मॅकेनिझ पॅलेस एकमध्ये होणार आहे. राजू शिंदे दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त के सेरा सेरा या चित्रपटाची उद्घाटनाचा चित्रपट म्हणून निवड करण्यात आली आहे. 6 मे रोजी सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे. त्यानंतर महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवला जाणार आहे.

या महोत्सवात फीचर फिल्म विभागात 21 पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाला 5 लाख रुपये, सर्वोत्कृष्ट दुसऱ्या चित्रपटाला 3 लाख रुपये, सर्वोत्कृष्ट प्रथम दिग्दर्शकाला 50 हजार तर द्वितीयला 35 हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त सर्व वैयक्तिक पुरस्कार 25 हजार रूपयांचे असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)