नवलोबानाथ पतसंस्थेत साडेचार कोटींचा घोटाळा : अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुणे- घोरपडे पेठ येथील श्री नवलोबानाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह मानद सचिव, व्यवस्थापकांनी चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप करून आणि ठेवींचे पैसे हडप करून तब्बल 4 कोटी 49 लाख 79 हजार 673 रुपयांचा घोटाळा केला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अध्यक्ष विवेक बाबासाहेब तांबे (रा. घोरपडे पेठ), मानद सचिव संजय दत्तात्रेय कोंडे (गोकुळनगर, कोंढवा), व्यवस्थापक शेखर भिकाजी पाचरणे (रा. राजगुरुनगर) यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. राजाराम शेळके (वय 57, रा. मुंढवा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेत श्री नवलोबानाथ नागरी सहकारी पतपंस्था आहे. एप्रिल 2009 ते मार्च 2016 या कालावधीत पतसंस्थेचे अध्यक्ष तांबे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आणि व्यवस्थापकांनी संगणमत करून बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज वाटप केले. जादा दराने व्याजदर देण्याच्या आमिषाने नागरिकांकडून ठेवी घेतल्या. ही रक्कम बॅंकेत जमा केली नाही. शिवाय, कर्जाचे हप्तेही वसूल केले नाहीत. ही रक्कम संस्थेच्या नूतनीकरणासाठी खर्च झाल्याचे दाखवत इतरत्र खर्च केली. अशा प्रकारे 4 कोटी 49 लाख 79 हजार 673 रुपयांचा घोटाळा केला. ठेवीदारांच्या ठेवी परत न करता त्यांची फसवणूक केली. यापैकी अद्यापि कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)