नवनिर्माण टेक फेस्टिव्हलसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक नवकल्पनेला आधुनिक जगातील तंत्रज्ञानाचे बळ मिळावे.तसेच इंजिनिअरींग,आर्किटेक्‍चर ,फ़ार्मेसी ऍग्री आदि शाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार कलेल्या तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक समस्या सोडवण्यासाठी राज्यस्तरीय “नवनिर्माण टेक फेस्टिवल 2019′ चे आयोजन करण्यात येत आहे. या नवनिर्माण टेक
फेर्स्टिवलमुळे विद्यार्थ्यांना विकसित तंत्रज्ञानाचे उत्तम व्यासपीठ मिळणार असल्याची माहिती नवनिर्माण टेक फेस्टिवलचे मुख्य आयोजक इनोवेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या फेस्टिवलमध्ये तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याच्या आग्रहाखातर मुदतवाढ केली करत 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत www.navnirmantechfesival.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने विनामुल्य नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. या टेक फेस्टिवलसाठी कृषी व ग्रामीण विकास, पाणी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था,कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य व बायोमेडिकल तसेच स्मार्ट सिटी या विषयापैंकी एक विषय निवडून प्रकल्पांची माहिती ऑनलाईन सादर करत स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. त्यामधील तीन उत्तम प्रभावी प्रकल्पांची निवड करण्यात येणार आहे.

प्रथम क्रमाकांचे प्रकल्पास 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षिस ,द्वितीय क्रमांकाच्या प्रकल्पास 77 हजार 778 रुपयांचे बक्षिस तसेच तृतीय क्रमांकाच्या प्रकल्पांस 55 हजार 555 रुपयांचे बक्षिसासहित ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेसहभागी विद्यार्थ्यांस प्रशस्तिपत्रक व सहभागी महाविद्यालयास ट्रॉफी असे विशेष बक्षिस देण्यात येणार आहे .त्याचप्रमाणे उत्तम प्रकल्प सादर करणारे विद्यार्थ्यांसाठी काही खास कंपनीकडून जॉब ऑफरही दिली जाणार आहे.
या स्पर्धेतील उत्तम प्रकल्प शासन, महापालिका, स्मार्ट सिटी आणि पीेएमआरडीकडे दिले जाणार आहे. ज्याच्या आधारे शहराच्या नागरी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो , अशी माहिती आयोजक कल्पेश यादव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)