नवज्योतसिंह सिद्धू, नसीरुद्दीन शहा व आमीर खान देशद्रोही – आरएसएस नेता  

अलिगढ – काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू, नसीरुद्दीन शहा आणि आमीर खान देशद्रोही असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी म्हंटले आहे. या तिघांची तुलना त्यांनी राजपूत राजा जयचंद आणि बंगालचे नवाब मीर जाफर यांच्याशी केली. सोमवारी अलिगढमध्ये एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

इंद्रेश कुमार म्हणाले कि, भारताला कसाब, याकूब, इशरत जहाँ सारख्या मुसलमानांची गरज नाही. तर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची गरज आहे. कसाबच्या मार्गावर चालणारे केवळ देशद्रोही असतात. नवज्योतसिंह सिद्धू, नसीरुद्दीन शहा आणि आमीर खानबद्दल बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले, ते चांगले अभिनेते असू शकतात. परंतु ते सन्मानाच्या लायक नाही कारण ते मीर जाफर आणि जयचंदसारखे देशद्रोही आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ani_digital/status/1090080068335009792

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)