नवजात बालकांना रोप देवून एप्रिल कुल साजरा

वाई मध्ये यंगस्टर्स ग्रुपच्यावतीने एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कुल अनोखा उपक्रम :-
वाई, दि. 2 (प्रतिनिधी) – मानव हा पर्यावरणातील एक घटक आहे. पर्यावरणाच्या अस्तित्वातच मानवाचे अस्तित्व आहे. हे न विसरता मानवाणे पर्यावरण संवर्धन केले आहे. कारण संपूर्ण जगासाठी पर्यावरण हा अति संवेदनशील विषय बनला आहे. कारण दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन ढासळताना दिसत आहे. मानवाने आपल्या आपली आसूरी प्रगती साधत असताना पर्यावरणाच्या संतुलनाचा कोणताही विचार नकरता अपरिमित असे नुकसान केले. यामुळे पर्यावरणाचे संतुलित चक्र तुटले असून दुष्काळ, अतिवृष्टी, भुंकप, अति हिमस्खलन, असे व अनेक नैसर्गिक आपत्तीं मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यामुळे सजीवांचे आस्तित्व आबाधीत राखायचे असेल तर मानवाला पर्यावरण पुरक जीवन पदधतीचा आवलंब करून पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज आहे. या जाणीवेतून वाई येथील यंगस्टर्स ग्रुपच्यावतीने वाईमध्ये यंगस्टर्स ग्रुपच्यावतीने एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कुल अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. संध्या यंगस्टर्स हा वाई तालुक्‍यामध्ये विविध क्षेत्रात काम करणारा ग्रुप सामाजिक क्षेत्रात खूपच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. या वाई यंगस्टर्सच्या तरूण मुलामुलींनी वाई मध्ये एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कुल हा उपक्रम राबविला. संपूर्ण देश आता एप्रिल फुल करण्यात व्यस्त असताना सध्याचा तापमानवाढीचा प्रश्‍न समजून घेवून सामाजिक जाणीवेतून या तरूणाईने वृक्षारोपण करून सर्वांना एक नवा संदेश दिल्याची माहिती यगंस्टर्स ग्रुपचे प्रतिनिधी ओंकार सपकाळ यांनी दिली.
नवजात बालकांच्या पालकांस एक रोप देवून वाई यंगस्टर्सच्या नाविण्यपूर्ण उपक्रमशील चळवळीस सुरूवात करण्यात आली. ग्रुपच्या तरूण मुलामुलींनी वाई तालुक्‍यातील प्रसुती होणाऱ्या रूग्णालयांना भेट देवून तेथील डॉक्‍टरांच्या मदतीने नवीन प्रसुती झालेल्या पालकांना ग्रुपच्यावतीने एक एक रोप देण्यात आले. आजकाल च्या काळात झाडांचे महत्त्व खूप वाढले आहे. तरूण मुलांमध्ये गावागावांत अनेक शाळा हायस्कूल व महाविदयालयांत वृक्षारोपण वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचे कामही ग्रुपच्या वतीने गेले 2 वर्ष करण्यात येत आहे. परंतु अजुनही जास्त प्रमाणात झाडांची कत्तल होत आहे. हे सर्व राखण्यासाठी आम्ही तरूण मुलांनी हा मार्ग निवडला. नवजात बालकांच्या पालकांस झाड देवून ते झाड आपल्या स्वत:च्या बाळाप्रमाणे वाढविण्यात यावे. त्याला स्वत:च्य बाळाचे नाव देवून वाढवावे व त्याची काळजी घ्यावी. आणि या जनजागृतीमध्ये एक भावनिक महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दरम्यान वरील उपक्रम घोटवडेकर हॉस्पिटल, अभ्यंकर हॉस्पिटल, अंकुर हॉस्पिटल, दातार हॉस्पिटल, पाटील हॉस्पिटल, घोरपडे हॉस्पिटल, परामणे हॉस्पिटल पाचवड, सुखांजनि हॉस्पिटल इत्यादी वाई पाचवड येथील हॉस्पिटल मधील नवजात बालकांना 50 रोपांचे वाटप करण्यात आले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी तन्वी पवार, चरिता माने, श्वेता दाहोत्रे, रूचिका खामकर, सई जेबले, गणेश जायगुडे, विशाल कुराडे आदित्य राऊत, दिपक माने, अभिषेक जाधव, आतुल तावरे, आकाश शेवते, ओंकार ओतारी, ओंकार सपकाळ यांनी परिश्रम घेतले.

संध्या पर्यावरणाचा प्रश्‍न खूपच गंभीर आहे. आपले सण, उत्सवांना पर्यावरण संवर्धनाची जोड देवून साजरे केले तर एक वेगळा आनंद सर्वांना मिळेल. वाई यगंस्टर्स ग्रुपचा हा स्तुत्य उपक्रम आहे. आम्ही येथून पुढे हॉस्पीटलमध्ये जन्मना-या प्रत्येक बाळास हॉस्पिटल तर्फे एक फळ झाड दत्तक म्हणून देवून त्यांचे संवर्धन करून घेणार आहोत.
– डॉ. विद्याधर घोटवडेकर

बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. यांचे गंभीर परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत. आम्हाला घरात बाळ जन्मल्याचा आनंद होता त्यामध्ये रोप दत्तक दिल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे. आम्ही स्वता:च्या बाळाप्रमाणे रोपाचे संगोपन करू
– मिनाज जमीर शेख

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.