नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धमकी देणाऱ्याला अटक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धमकी दिल्याप्रकरणी कोईम्बतूर पोलिसांनी १९९८ च्या बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या मोहम्मद रफिकला अटक केली. मोहम्मद रफिकने एका ट्रकचालकाशी फोनवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा उल्लेख केला होता.

कोईम्बतूरमधील १९९८ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगून बाहेर आलेला मोहम्मद रफिक काही दिवसांपूर्वी ट्रकचालक प्रकाशशी बोलत होता. नवीन गाड्यांच्या खर्चाबाबत त्या दोघांमघ्ये चर्चा सुरु होती. मात्र, चर्चेदरम्यान रफिक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलू लागला.  नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे त्याने प्रकाशला सांगितले.  या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. अखेर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली.

दरम्यान, सोमवारी पोलिसांनी मोहम्मदला अटक केली असून न्यायालयाने त्याला १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोईम्बतूरमध्ये फेब्रुवारी १९९८ मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये ५८ जणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात मोहम्मद दोषी ठरला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)