नरेंद्र मोदी तोतया पंतप्रधान, सरकार भ्रष्ट

खासदार कुमार केतकर


भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हाही कॉंग्रेसच्या स्टेजवर

पुणे – नरेंद्र मोदी यांच्या नसानसात खोटारडेपणा भिनला असून, या भूलथापांना मतदारही भुलले आहेत. नरेंद्र मोदी हे तोतया पंतप्रधान असून, ही तोतयागिरी आपण किती काळ चालू ठेवायची याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

वसंतदादा सेवा संस्था आयोजित व्याख्यानात केतकर बोलत होते. यावेळी भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व संयोजक संजय बालगुडे उपस्थित होते. व्याख्यानाच विषय “2014 नंतरचा भारताचा विकास किती खरा किती खोटा’ हा विषय होता.

केतकर म्हणाले, मोदी हे रिझर्व्ह बॅंकेचे अवमूल्यन करत आहे. नोटाबंदी काळातील सर्व तपशील अजून बाहेर आला नाही. मोदी सरकारकडून रिझर्व्ह, प्रसारमाध्यांसह संस्थात्मक ऱ्हास केले जात आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी “जीएसटी’ स्वीकारणार नाही, असे जाहीर केले. मात्र सत्ता आल्यानंतर देशात जीएसटी लागू केला जात आहे.

मोदी यांनी किती देशांना भेटी दिल्या, यावरून परराष्ट्र धोरण यशस्वी ठरत नाही. तसे असते, तर वैमानिकांना परराष्ट्रमंत्री केले असते. मोदींनी स्वतंत्र दहशत यंत्रणा तयार केली आहे. काही दिवसांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मागे टाकतील, असंही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मोदी स्वतः घेतलेल्या निर्णयांची पाने पत्त्यासारखी मंत्र्यांच्या हाती देतात. भारताला असा खोटारडा पंतप्रधान भविष्यात कधीही मिळू नये, असेही केतकर म्हणाले.

“रॅफेल विमान खरेदी, मुंबई-अहमदाबार बुलेट ट्रेन, परदेशीतील काळा पैसा, नोटी बंदी, अमित शहाच्या मुलाची कंपनीचा गैरव्यवहार, बॅंकिंग घोटाळा मोदी सरकारच्या काळात झाले आहेत. या सर्व प्रकरणातील माहिती दडवली जात असून, त्याविषयी तपशील जाहीर केले जात नाही. या सर्व घोटाळा पाहता आतापर्यंच्या सरकारमध्ये मोदी सरकार सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा शाब्दीक हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सर्व पुराव्यानिशी लेखाजोखा मांडला.

हवाई रूख बदल रही है…
खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोजक्‍याच शब्दांत नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. सध्याचे सरकार “वन मॅन शो’ सुरू आहे. मी भाजप अथवा पक्षाच्या विरोधात बोलत नाही, पण केवळ त्यांना वास्तव समजावे या हेतूने बोलत आहे. लोकांना दिलेल्या आश्‍वासने अजूनही पूर्ण झाली नाही. लोकांच्या मनात काय आहे, त्याची भावना मी शब्दात मांडत आहे. खरे बोलणे चुकीचे असेल, तर ते मी मांडणारच. अहंकार आणि गर्व असेल, तर त्याचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या परिस्थिती पाहता “उन्हे खबर नही की रुख बदल रही है…’ अशा शब्दांत त्यांनी मोदींना टोला लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले स्वातायंतर प्राप्ती नंतर खर्या अर्थाने आपल्या देशात लोकाशीची मुले रुजली नसल्याने ह्या देशात प्रत्येक पंतप्रधान हा तोतयाच समजावा लागेल त्यासाठी ह्यावर निर्नायकी उपाय वरील विचारवंतांनी सुचविणे महत्वाचे होते तेव्हा आता माझ्या विचाराने देशातील समस्त विचारवंतांनी, लेखकांनी, प्रसार माध्यमांनी एकत्र येऊन १२५ कोटी जनतेतून ५०० सर्वच दृष्टीने योग्य थरातील असे उमेदवार निवडावे व त्यांनास्वतंत्र पाने प्रत्येक निवडणुकीत निवडणूक लढविण्यास उभे करावे व अशा उमेदवारांची यादी प्रकाशित करून मतदारांना ह्याच उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करावे हे शिवधानुष पेलण्याची वरील मंडळींची व ह्यांच्या समविचारी विचारवंतांची , लेखकांची , साहित्यिकांची तयारी आहे का ? नसल्यास तोंडात जोर आहे म्हणून मु मे आया सो बक दिया , गांड मे आया सो ह्ग दिया ह्या हिंदी म्हणीनुसारच ह्यांनी व्यक्त केलेल्या भाषणाची तुलना करावी लागेल कारण त्यासाठी मनगटात जोर असावयास हवा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)