नरेंद्र मोदींनी लोकशाहीला छिन्नविछिन्न केले- छगन भुजबळ

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, नथुराम गोडसे याने आधी महात्मा गांधी यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक महात्मा त्याने संपवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेच केलं. मोदी निवडून आले आणि संसदेची पायरी चढताना त्यांनी संसदेचे दर्शन घेतले आणि लोकशाहीला छिन्नविछिन्न केले.

मोदींनी दडपशाही आणून ठेवली आहे. कोणी काय खायचे, काय बोलायचे, हे ठरवले जात आहे. आता निवडणूक येणार म्हणून काही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जात आहे. सरकार पैसे देईलही, पण आज दहा हजार देतील आणि सत्तेत आले की डबल पैसे काढून घेतील. ही मन की बात झुठी बात आहे. यात गोष्टी रंगवल्या जात आहे. सर्व चांगलं सुरू आहे असं लोकांच्या मनावर बिंबवलं जात आहे. असे भुजबळ म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले भाजपा सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र ती त्यांना करायची नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विधिमंडळात आवाज उठवला, जेल भरो आंदोलन केले, शेतकऱ्यांनी पुणतांब्यात संप पुकारला तेव्हा हे गेंड्याच्या कातडीचं सरकार हललं आणि सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण ती कर्जमाफी देखील फसवी निघाली. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे, मात्र सरकारतर्फे त्याचे नियोजन नाही. सरकारचं जलयुक्त शिवार फेल झालंय हे दिसू नये म्हणून टँकर न देण्याचे तोंडी आदेश या सरकारने प्रशासनाला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)