‘नया पाकिस्तान’ साठी इम्रान खान यांचा ११ कलमी कार्यक्रम

लाहोर : देशाच्या सर्वोच्च हितासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा करत पाकिस्तानच्या तेहेरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी नवीन ११ कलमी अजेंड्याची घोषणा केली आहे.

लाहोर येथील मिनार-ए-पाकिस्तान येथे खान यांच्या पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आपल्या या ११ कलमी कार्यक्रमात खान यांनी शिक्षण, आरोग्य, महसूल निर्मिती, भ्रष्टाचार, गुंतवणूक, रोजगार, शेती आणि कृषिविकास, विविध मंडळे, पर्यावरण, पोलीस यंत्रणा, महिला शिक्षण या मुद्यांवर भर दिला, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

यावेळी जनतेशी बोलताना इम्रान खान म्हणाले, ‘या देशाची निर्मिती का झाली, याची तुम्हाला माहिती आहे का? याबद्दल देशाचे निर्माते आणि कैद-ए-आझम मोहम्मद आली जिना यांच्या दूरदृष्टीचा विचार केल्यास नक्की उत्तर मिळेल. जिना यांच्या धोरणानुसार देशातील सर्व नागरिकांना समान न्याय, हक्क मिळणे अपेक्षित आहे. मग तो नागरिक मुस्लीम, हिंदू, शीख किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असो. हा देश शांततेचे प्रतिक झाला पाहिजे. त्याला कायदा आणि न्यायाचा आधार असावा’, असेही इम्रान खान म्हणाल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)