नदीपात्रालगतच्या शेतात बेसुमार वाळू उपसा

शेतमालकांची महसूल विभागाकडे तक्रार

फलटण, दि. 2 (प्रतिनिधी) – ठाकुरकी, ता. फलटण येथील बाणगंगा नदीपात्रालगत शेतजमिनी असून यातील चार एकरात वाळूचा थर आहे. वाळू चोरट्यांनी याठिकाणी बेकायदा वाळू उपसा सुरू केला आहे. यामुळे संबंधित शेतमालकांनी याबाबत प्रांताधिकारी, तहसीदार व पोलिसांकडे तक्रार देवून याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती अशी, विनायक आनंदराव खलाटे व सहकारी यांच्या 22 एकर बाणगंगा पात्रालगतच्या क्षेत्रापैकी 4 एकरात सुमारे 20 फूट खोलीवर वाळूचा थर आहे, तरीही याठिकाणी त्यांनी पीके घेण्याला प्राधान्य दिले. परंतु, वाळू चोरट्यांनी रात्री-अपरात्री याठिकाणी येवून 4 एकर जमीन अक्षरश: खोदून काढली आहे. बेसुमार वाळू उपशामुळे पिके तर घेता येत नाहीत. शिवाय विंधन विहिरी, पाईप लाईन यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत खलाटे यांनी महसूल प्रशासनाला अनेक अर्ज करून अवैध वाळू उपशाला प्रतिबंध करण्याची मागणी केली. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या संमतीनेच हा प्रकार सुरू आहे का असा सवाल उपस्थित होते. महसूल खात्याने संबंधितावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खलाटे यांनी केली आहे.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.