नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर

बुटीबोरी, शिरोळ, वडगाव-मावळ खुल्या प्रवर्गासाठी
मुंबई – राज्यातील नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत आज नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. शिरोळ व बुटीबोरी नगर परिषदाचे व वडगाव मावळ नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत झाले आहे.

राज्यातील नवनिर्मित 2 नगरपरिषदा व 3 नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची आज सोडत काढण्यात आली. यावेळी आमदार बाळा भेगडे, उपसचिव संजय गोखले, अवर सचिव सचिन सहस्रबुध्दे आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी या दोन नगरपरिषदा या सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेंदुर्णी, मुक्ताईनगर (दोन्ही जि. जळगाव) व वडगाव मावळ या तीन नगरपंचायतींपैकी शेंदुर्णी नगरपंचायत नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी, तर मुक्ताईनगर नगरपंचायत ही अनुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव झाली असून, वडगाव मावळ नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)