नगरसेवक अविनाश बागवेसह सहा जणांना जामीन

पुणे- कासेवाडीत अशोक तरुण मंडळाच्या मिरवणुकीत राजकीय वादातून दोन गटात जोरदार वादावादी झाल्याच्या प्रकरणात खडक पोलिसांनी अटक केलेले कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह सहा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दर गुरूवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत खडक पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, तपासास सहकार्य करणे, तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी पोलीस स्टेशनला जाणे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जायचा नाही, या अटीवर सर्वांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी मंजूर केला आहे. अविनाश बागवे (वय 43), जयवंत सुरेश मोहिते ( 34), सूरज सदन कांबळे (30), अरुण दिगंबर गायकवाड (50), सुरेखा राजू खंडाळे (40), विठ्ठल सोपान थोरात (64, सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांची जामीन झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी युवराज सुलतान अडसूळ (वय 27, रा. भवानी पेठ) यांनी तक्रार दिली आहे. कासेवाडी भवानीपेठ येथे हा प्रकार घडला. अशोक तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक जात असताना अविनाश बागवे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी देवून ट्रॅक्‍टर चालक सोमनाथ मस्के व साऊंड सिस्टीमचे मालक ओंकार पंढरीनाथ कोळी यांना मारहाण करण्यास सांगितले. आरोपींनी मस्के आणि कोळी यांना मारहाण करुन साऊंड सिस्टीमची तोडफोड केली. विसर्जन मिरवणुकीला अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ज्ञानेश्‍वर मोरे यांनी, तर बचाव पक्षातर्फे एल. एस. घाडगे पाटील, हर्षद निंबाळकर, शाहिद अख्तर, सुरेश देवकर, अरुण सोनवणे, सागर घाडगे, एकनाथ कांबळे, डी. टी. शेलार, साबीर खान, अतुल गुंड पाटील, ऋषिकेश घोरपडे यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)