नगरसेवकाचे उपोषण दुसऱ्या दिवशी चालूच

जामखेड – जामखेड नगरपरिषदेच्यावतीने सुरू असलेली विविध विकास कामे अंदाजपत्रकानुसार होत नाहीत. पालकमंत्र्यांच्या मर्जीतील ठरलेल्या ठेकेदारांच्या मनमानी पद्धतीने ही कामे निकृष्ठ दर्जाचे होत आहेत. कोट्यवधी रुपये निधी मंजूर झाला, मात्र प्रत्यक्षात 25 टक्‍क्‍यांची कामे केले. उर्वरित 75 टक्‍के ठेकेदार व अधिकाऱ्यांनी खिशात गेल्याचा आरोप करीत नगरसेवक दिगांबर चव्हाण यांनी सुरू केले उपोषण गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते.
या कामांची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक चव्हाण यांनी समर्थकांसह जामखेड नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनाची नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली नाही. नगरपरिषदेच्या सर्व पदाधिकारी व प्रशासनाचा मनमानी कारभार चालू देणार नाही, असे आंदोलनास पाठिंबा देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात यांनी उपोषणस्थळी म्हटले आहे.
चव्हाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक दोनमध्ये नरसोबा मंदिर ते शाळा परिसरातील पेव्हिंग ब्लॉकचे काम निकृष्ट झाले आहे. त्याची चौकशी करून अंदाजपत्रकाप्रमाणे ते काम पुन्हा करावे. प्रभाग दोनमधील प्रलंबित असलेल्या बारस्कर ते तांबे यांच्या घरासमोरील भुयारी गटार व कॉंक्रिट रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात यावे. नगरपरिषद अंतर्गत शहरात सुरू असलेली सर्व विकास कामे अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात यावीत. ज्या प्रभागात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अंदाजपत्रकांचे डिजीटल फलक लावण्यात यावेत. नगरपरिषदेच्या सर्व निविदा नियमानुसार व्हाव्यात, शहरातील महत्वाचा व संपूर्ण शहराचे लक्ष वेधलेल्या खर्डा रोड कॉंर्नर ते स्मशानभूमी तपनेश्वर रस्त्याचे कामे तातडीने सुरू करण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी नगरसेवक दिगांबर चव्हाण उपोषणास बसले आहेत.
या आंदोलनास माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, नगरसेवक पवन राळेभात, अमित जाधव, फिरोज कुरैशी, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, राष्ट्रवादीचे नेते भगवान गिते, डॉ. कैलास हजारे, रायुकॉंचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, यूवा नेते अमोल गिरमे, कुंडल राळेभात, अनिल बाबर, राजू वारे, प्रकाश सदाफुले, पी.के. गुरव, रावसाहेब डाडर, सखाराम मुरूमकर यांच्यासह शहरातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आंदोलनास नागरिकांचा मोठा पाठिंबा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)