नगरमध्ये ई-कचरा संकलन केंन्द्र कार्यान्वित

वसुंधरा दिनानिमित्त, हरियाली सस्थेने सुरु केला उपक्रम
नगर – हरियाली संथेच्या वतीने नगरमधील ई-कचरा नागरीकांच्या सहकार्याने एकत्रित करून तो पुनर्वापरासाठी व पुनर्रचक्रीकरणासाठी देण्यात येणार आहे .हा उपक्रम आज दि. एप्रिल,जागतिक वसुंधरादिनाचे औचित्य साधून दादा चौधरी विद्यालय,कौशल्य सेतू केंद्र येथे कचरा वेचक महिला कमल खुडे याच्या हस्ते इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचे निकामी झालेले भाग बंदिस्त खोक्‍यात टाकून कार्यान्वित करण्यात आला.
सस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती देताना सागितले कि इलेक्‍ट्रीक व इलेक्‍ट्रॉनिक वस्तू वापरचे प्रमाण प्रचंड वाढले असून .या वस्तू वापरातुन अनेक प्रकारचेनिकामीझालेले भाग रोजच्या कचऱ्यामध्ये एकत्रित करून फेकले जातात.यामध्ये विविध प्रकारचे प्रदूषके असतात.हि प्रदूषके मानवी आरोग्यावर हानिकारक परिणाम करतात. तसेच भूगर्भातील पाणी दुषित होते.,वायू प्रदुषणात भर पडत आहे .एकुणच पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे .म्हणून हा सर्व ई-कचरा संकलित करण्यासाठीनगर शहरातील जुने गावठाण सह सावेडी,भिंगार व केडगाव या ठिकाणीहि नागरिकांच्या सहकर्याने केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. यामध्ये संकलित झालेला कचरा पुणे येथे शास्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगून नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन खामकर यांनी केले.
प्रमुख व्याख्याते सारडा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा.अरविंद गोरेगावकर यांनी वसुंधरेच्या रक्षणासाठी युवा पिढीने पुढाकार घेऊन वाढते वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे सांगून त्या करिता वाहनाचा वापर मर्यादित करून व्यापक वृक्षलागवडीची आणि संवर्धनाची चळवळ हाती घ्यावी. व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता रक्षक म्हणून भूमिका पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन शरद पटवेकर यांनी केले तर आभार वनिता बागडे यांनी मानले.यावेळी अनिता पोरे,संजय बेल्हेकर,गणेश गायकवाड,रमेश घुले ,आदिसह दादा चौधरी विद्यालय, प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्रातील शिक्षक,विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)