नगरपालिकांतर्गत प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करावा – आ.कोल्हे 

कोपरगाव  – कोपरगांव नगरपालिकांतर्गत प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करावा अशी मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली.
येथील कोपरगांव नगरपालिका इमारत बांधकामाची पाहणी करण्यांसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी आले असता तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे, तहसिलदार किशोर कदम, कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, पराग संधान, पप्पु पडीयार, स्वप्नील निखाडे, जितेंद्र रणशुर, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक फकिरराव बोरनारे, बाळासाहेब नरोडे, सोमेश कायस्थ, रंजन जाधव, नारायण गवळी आदी उपस्थित होते.
आमदार स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणांल्या की, शहरातील झोपडपट्‌टी कायम करून, विस्थापीत अतिक्रमण धारकांना गाळे वाटप करून त्यांच्यासाठी खोका शॉप बनविणे, आयटीआय नुतन इमारतीची दुरावस्था झाली असून ती कार्यान्वीत करणे, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची अंमलबजावणी व त्यातील अडचणी दूर करणे, दैनंदिन कामे करतांना नगरपालिका अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडींने भरणे, 42 कोटी रूपये खर्चाची पिण्यांच्या पाण्यांची योजना काम 90 टक्के पुर्ण असुन उर्वरित काम तातडींने पुर्ण करणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे काम पुर्ण असून विद्युत व फर्नीचर अभावी ते प्रलंबित आहे आदी कामांचा निपटारा तातडीने करावा. शहरातून जुनीगंगा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यासाठी निधी देवून हे काम मार्गी लावावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)