नक्षलवाद्यांच्या चकमकीत उपकमांडरसह तीन ठार

गोंदिया :  राजनादंगाव जिल्ह्यातील बोरतलाव पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कनघुर्राजवळील चंदिया डोंगरीच्या जंगलात छत्तीसगड पोलिसांनी बक्षिस असलेल्या तीन नक्षलवाद्यांना चकमकीदरम्यान ठार केल्याची घटना मंगळवारी (दि.२९)घडली. सकाळी नक्षलवादी जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर निघालेल्या डीआरबी पोलिस फोर्स सर्चिंग करीत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यात पोलिसांनीही प्रतिउत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नक्षलवादी ठार झाले.

घटनास्थळावर मिळालेल्या मृतदेहामध्ये दर्रेकसा दलमचा उपकमांडर आझाद याचाही समावेश आहे, त्याच्यावर ५ लाखाचे बक्षिस होते. इतर दोन मृतदेहांची अद्यापही ओळख पटलेली नाही. दरम्यान या घटनेसंदर्भात गोंदियाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदिप आटोडे यांना विचारणा केली असता त्यांनी राजनांदगाव पोलिसांच्या चकमकीत आझाद ठार झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)