नऊ लाखांचा खतांचा साठा जप्त

लोणी काळभोर – शेती उपयुक्‍त खतांची विक्री, साठा व उत्पादन करण्यासाठी कुठलीही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीर काम करुन तब्बल नऊ लाख रुपयांची खतांचा साठा केल्याप्रकरणी एक जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू दादा बोरकर (वय 33, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर हवेली पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमित विजयसिंह रणवरे (रा. केशवनगर, ता. हवेली) यांनी तक्रार दाखल केली आहे. वडकी (ता. हवेली) येथील हनुमंत दिनकर मोडक यांच्या मालकीच्या दिनकर कॉम्प्लेक्‍स या इमारतीत राजू बोरकरने विक्रीसाठी खते, औषधांचा साठा केला होता. पार्डनसन ऍग्रो मल्टीकॉम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जैविक खतांचा साठा या ठिकाणी करण्यात आला होता. या खतांच्या उत्पादन, विक्री, साठा या विषयी कुठलीच शासकीय परवानगी न घेता गेल्या चार महिन्यांपासून हा व्यवसाय सुरू होता. कृषी अधिकारी अमित रणवरे यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे जैविक किटकनाशकासह खते यांचा 8 लाख 88 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल तेथे आढळून आला. त्यामुळे अमित रणवरे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयसिंग जाधव करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)