नऊ बंधाऱ्यांसाठी सहा कोटी-प्रा. शिंदे

जामखेड – दुष्काळी परिस्थितीवर मात करून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडवले पाहिजे. या अडवलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना दुष्काळात झाला पाहिजे, या उद्देशाने तालुक्‍यातील नऊ बंधाऱ्यांसाठी सहा कोटी 23 लाख रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
प्रा. शिंदे यांच्या हस्ते तालुक्‍यातील विविध बंधाऱ्यांचे जलपूजन व भूमिपूजन करण्यात आले. या नंतर तालुक्‍यातील विविध विकासकामांच्या जलपूजन व भूमिपूजनाला सुरवात केली. सकाळी जामखेड तालुक्‍यातील नायगाव येथील मंदिराच्या 71 फुटी शिखरावर कळस चढविण्यात आला.तसेच दुपारी खर्डा परिसरातील मोहरी, बांदखडक, दरडवाडी येथील बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. तसेच पिंपरखेड येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचा लोकार्पण सोहळा व बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. या नंतर सायंकाळी वंजारवाडी येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे भूमिपूजनदेखील पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्‌घाटनानंतर प्रा. शिंदे म्हणाले, की कर्जत येथे आठ बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली आहेत. तरडगाव 1, सोनेगाव 1, दिघोळ येथे 2, रत्नापूर 3, बाळगव्हाण 1 व पिंपरखेड 1 अशा एकूण नऊ बंधाऱ्यांसाठी 6 कोटी 23 लाख रुपये मंजूर केले आहेत. प्रत्यक्षात त्याचे भूमिपूजनदेखील झाले आहे. या बंधाऱ्यांचा मुख्य उद्देश म्हणजे टंचाई काळात या साठवलेल्या पाण्याचा उपयोग झाला पाहिजे. ग्रामस्थ जशी मागणी करीत आहेत, त्या पद्धतीने बंधारे तयार होत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने कॉंक्रिट वापरून दीड महिन्यात या बंधाऱ्यांची कामे पूर्ण होणार आहेत. कामे दर्जेदार होण्यासाठी प्रशासनास सूचना दिल्या आहेत.
या वेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, उपसभापती सूर्यकांत मोरे, खर्ड्याचे सरपंच संजय गोपाळघरे, जिल्हा परिषदेचे सदस्य सोमनाथ पाचारणे, अनिल लोखंडे, सभापती सुभाष आव्हाड, नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक महेश निमोणकर, भाऊराव राळेभात, पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, तरडगावचे सरपंच भाग्यश्री सानप, काशिनाथ ओमासे, करण ढवळे, बांधखडकचे सरपंच केशव वणवे सानप, उपसरपंच चतुर्भुज बोलभट, पद्मराज बिरंगळ, शहाजी म्हस्के, सरपंच लहु शिंदे, पृथ्वीराज वाळुंजकर, सुभाष जायभाय, तानाजी फुंदे, वैजिनाथ दराडे, भरत काळे, नानासाहेब गोपाळघरे, वैजिनाथ पाटील, जयराम खोत, सुग्रीव वायकर, आश्रु खोटे, सुरेश भोसले, फैय्याज शेख, दत्तात्रय जाधव, संजय कुटे, नंदू सानप, रामचंद्र चव्हाणसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)