नंदामुरी हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू

हैदराबाद/अमरावती – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचा मुलगा नंदामुरी हरिकृष्णा यांचा कार अपघातात मृत्यू झाला. 63 वर्षीय नंदामुरी हरिकृष्णा राज्यसभा सदस्य होते. याशिवाय दक्षिणात्य चित्रपटात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. नालगोंडा हायवेवर आज सकाळी कारची दुभाजकाला धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती कामिनेनी रुग्णालयाचे अधिकारी अमिर खान यांनी दिली.

नंदामुरी हरिकृष्णा हे दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआर यांचे वडिल होते. हरिकृष्णा यांचा दुसरा मुलगा कल्याण राम हा सुद्धा दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. हरिकृष्णा हे टीडीपी पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांचे नातेवाईकही होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हरिकृष्णा हे कवालीवरुन नेल्लोरला जात होते. एका चाहत्याच्या लग्न समारंभाला जात असताना हा भीषण अपघात झाला. नालगोंडा हायवेवर त्यांची गाडी दुभाजकला धडकली. हा अपघात इतका भिषण होता की त्यांची कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला जावून उलटली. अपघातावेळी हरिकृष्णा स्वत: गाडी चालवत होते. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होवून रक्‍तस्त्राव झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जबर जखमी झालेल्या हरिकृष्णा यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अपघात झाले ते ठिकाण हैदराबादपासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे.

ज्या हायवेवर हरिकृष्णा यांचा अपघाती मृत्यू झाला, त्याच हायवेवर 2014 मध्ये त्यांच्या मुलाचाही अपघाती मृत्यू झाला होता. दुर्दैवी योगायोग म्हणजे ज्याठिकाणी हरिकृष्ण यांचा अपघात झाला, त्या ठिकाणाच्या काही अंतरावरच त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)