ध्वनी प्रदुषणासंबंधी तक्रार करण्याचे पोलीस उपायुक्तांचे आवाहन

मुंबई: राज्य शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील 110 ठिकाणी शांतता क्षेत्र घोषित केले आहे. या क्षेत्रात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार पाच वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ध्वनीप्रदुषणासंबंधी तक्रार असल्यास दूरध्वनी क्रमांक, इमेल,व्हॉटसअपवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे.

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सणाच्या काळात ध्वनी प्रदुषण होऊ नये,यासाठी मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे. शांतता क्षेत्रात रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत लाऊडस्पीकर, फटाके, वाद्ये इ. वाजविण्यास सक्त बंदी करण्यात आली आहे. त्यानुसार शांतता क्षेत्राची वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार डेसिबलची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वर्गीकृत शांतता क्षेत्रातील आवाजाची मर्यादा

विभागाचे कोड विभाग/झोनची वर्गवारी आवाजाची मर्यादा/क्षमता (डेसिबलमध्ये)
दिवसा रात्री

 

औद्योगिक क्षेत्र 75 70
बी विपणन/व्यापारी क्षेत्र 65 55
सी रहिवासी क्षेत्र 55 45
डी शांतता क्षेत्र 50 40

ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे कैद किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच शिक्षा होऊनही पुन्हा उल्लंघन सुरू ठेवल्यास प्रत्येक दिवसाला 5 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कलम 15 (1) नुसार शिक्षा झाल्यापासून 1 वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असा गुन्हा केल्यास 7 वर्षापर्यंतची शिक्षेची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकांनी ध्वनी प्रदुषणाची तक्रार करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त (अभियान) मंजुनाथ शिंगे यांनी केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील शांतता क्षेत्राची यादी

बॉम्बे हॉस्पिटल, एसएनडीटी महिला महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय,जयहिंद महाविद्यालय, शासकीय गव्हर्नमेंट विधी महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ व न्यायालय, शहर दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय, जे.जे. रुग्णालय, अवर लेडी ऑफ अवर हायस्कूल, श्रीमती कमलादेवी मित्तल आयुर्वेदिक रुग्णालय, लघुवाद न्यायालय (स्मॉल कॉज कोर्ट), फेलोशीप हायस्कूल, सोफिया महाविद्यालय,गिरगाव कोर्ट, ब्रीच कँडी हॉस्पिटल, पारसी फायर मंदिर, रिलायन्स हॉस्पिटल (हरकिशनदास हॉस्पिटल), जसलोक हॉस्पिटल, बाणगंगा तलाव, सेंटर मेरी इंग्रजी शाळा (एम सितारा बोर्ड), प्रिन्स अली खान रुग्णालय, मसीना हॉस्पिटल,माझगाव कोर्ट, नायर हॉस्पिटल, साधना विद्यालय, एस.आय.ई.एस. कॉलेज, डॉन बास्को, यू.आय.सी.टी. महाविद्यालय, व्हि.जे.टी.आय महाविद्यालय, राजा शिवाजी विद्यालय, सोमय्या वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, के.ई.एम.रुग्णालय,भोईवाडा न्यायालय, शिवडी जलदगती न्यायालय, शिंदेवाडी न्यायालय,आदर्श नगर मराठी शाळा नं. 2, पोद्दार रुग्णालय, लाला लजपतराय महाविद्यालय,एफ.पी.एच. रुग्णालय, प्रभादेवी कॉन्व्हेंट हायस्कूल, रुपारेल महाविद्यालय,हिंदुजा रुग्णालय, व्हिक्टोरिया चर्च, व्ही.एन.देसाई म्युनसिपल हॉस्पिटल,अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी न्यायालय व लघुवाद न्यायालय, कामगार व औद्योगिक न्यायालय, मुंबई विद्यापीठ, एन.डी. महाविद्यालय, टी. एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, होली फॅमिली रुग्णालय, सेंट जोसेफ शाळा, मुंबई एज्युकेशन ट्रस्ट, सेंट टेरेसा चर्च, माऊंट मेरी चर्च, बडी मस्जिद, साठे महाविद्यालय, पार्ले टिळक विद्यालय, सरस्वती बाग मनपा शाळा,ट्रॉमा केअर हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, भवन्स महाविद्यालय, कूपर रुग्णालय, मिठीभाई महाविद्यालय, एच.एम.आय. एम. एस. भोगूबाई महाविद्यालय, विलेपार्ले न्यायालय, ए.के. वैद्य रोड न्यायालय, आरे रोडवरील मस्जिद, सेंट जॉर्ज शाळा, मित्तल महाविद्यालय, दिंडोशी न्यायालय, ठाकूर तंत्रविद्यानिकेतन, ई.एस.आय.एस. रुग्णालय, मथुरादास जैन मंदिर, पोईसर म.न.पा. शाळा, बोरीवली न्यायालय, शक्तीधान, मदर टेरेसा इन्स्टिट्यूट, चारकोप मॅटर्निटी होम, दत्तपाडा चोगले माध्यमिक शाळा, भगवती रुग्णालय, सेंटर फ्रान्सिस अभियांत्रिकी महाविद्यालय, एस.व्ही.पी. महाविद्यालय, ईडन हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, केदारनाथ विद्या प्रसारणी संचालित स्वदेशी मराठी शाळा,पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, कोहिनूर हॉस्पिटल, लुंबिनी बाग, मनपा शाळा क्र.1,2,3, शताब्दी हॉस्पिटल, आर.सी.एफ. म्युनि. शाळा, एस आणि ए. के. पॉलिटेक्निक, विवेकानंद कॉलेज, तुळसी टेक्निकल आणि विवेकानंद शाळा, मॉर्डन इंग्लिश शाळा, जैन मंदिर, के. जे. सोमय्या कॉलेज,राजावाडी म्युनसिपल जनरल हॉस्पिटल, पी.जी. गरोडिया शाळा, फातिमा हायस्कूल, सर्वोदय हॉस्पिटल, कांजूरगाव मनपा शाळा, नेव्हल रुग्णालय,आयआयटी रुग्णालय, हिरानंदानी रुग्णालय, व्होकार्ट हॉस्पिटल, मुलुंड न्यायालय,आय.टी.आय. मुलुंड (पू.), केळकर महाविद्यालय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)