ध्येय ठेवून वाटचाल केल्यास यश निश्‍चित मिळते – नितीन मुडलगीकर

गौरीशंकरचे प्रा. मनिश मोरे यांची शासकिय आयटीआयच्या प्राचार्यपदी निवड
सातारा – ध्येयवादी वृती ठेवून जीवनात वाटचाल केल्यास यश निश्‍चित प्राप्त होते असे मत गौरीशंकरचे प्रशासकिय अधिकारी नितीन मुडलगीकर यांनी व्यक्त केले. ते गौरीशंकरच्या सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍण्ड मॅनेजमेंट लिबंच्या महाविद्यालयात कार्यरत असणारे प्रा. मनिश मोरे यांची जळगाव (येवला) येथील शासकिय औद्यगिक प्रशिक्षण संस्था (आयईआय) येथे प्राचार्य पदी निवड झाल्याबदल त्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रा. मनिश मोरे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. या प्रसंगी गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्या डॉ. तुजा कुलकर्णी, प्राचार्य विजय राजे प्राचार्या डॉ. दिप्ती बर्गे, विभाग प्रमुख प्रा. रंजना ढमाळ, विभाग प्रमुख प्रा. सायली जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, प्रा. मनिश मोरे यांनी स्पर्धा परीक्षेतून प्राप्त केलेले यश गौरीशंकर संस्थेसाठी निश्‍चित अभिमानास्पद आहे. यावेळी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. मनिश मोरे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा. राहुल लाड यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)