ध्येय गाठण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा : अश्‍विनी महांगडे

सातारा, दि. 21 (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय नजरेसमोर ठेवून चालावे. ध्येयाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. मात्र, ध्येयप्राप्तीसाठी विद्याथर्यंनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन स्वराज्य रक्षक संभाजी फेम कु. अश्‍विनी महांगडे यांनी केले.
सातारा येथील लाल बहादूर शास्त्री कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शुभांगी गावडे होत्या. कु. महांगडे म्हणाल्या, छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर निष्ठा आणि प्रयत्नांची शिकस्त करा असे आवाहन कु. अश्‍विनी महांगडे यांनी केले.
प्राचार्या शुभांगी गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी स्वामी विवेकानंद व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्याध्यक्ष शेखर मोहिते, प्रा. एम. बी. पवार, डॉ. विकास जाधव, प्रा. विनायक भोई, डॉ. वैभव आगळे, प्रा. बी. एस. कालगावकर आदी उपस्थित होते. प्रियांका कारंडे हिने आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.