धोमच्या मत्स्यबीज केंद्राल साडेतीन कोटींचा निधी

मत्स्य व्यवसायाला अच्छे दिन;मंत्री जानकरांचा पुढाकार
सातारा -सातारा जिल्ह्याला लाभलेल्या धरणापैकी एक असलेल्या धोम धरणातील मत्स्यबीज केंद्राला राज्य सरकारने भरीव निधी दिल्याने मत्स्य व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत. राज्यातील मत्स्यबीज प्रजनन वाढीसाठी राज्यातील सहा केंद्रांना राज्य शासनाने वीस कोटींची भरीव तरतुद केली आहे. त्यातील साताऱ्यातील धोमच्या वाट्याला 3 कोटी 33 लाखांचा निधी आला आहे. त्यामुळे धोम धरणातील मत्स्यबीज प्रजनन पाच पटीने वाढण्यास मदत होणार आहे.

राज्यात 4.18 लाख हेक्‍टर गोड्या पाण्याचे क्षेत्र आहे. त्यातून सध्या राज्यातील 30 मत्स्य केंद्रावरून प्रतीवर्षी 27 टन प्रजनकाची संख्या आहे. त्यामुळे राज्याला 159 टन मत्स्य प्रजनकाची आवश्‍यकता आहे. तसेच राहू,कटला,मृगळ या प्रजातीचे प्रजनक मासे छत्तीसगड,आंध्रप्रदेश,प.बंगाल या राज्यातून आयात करावे लागत आहेत. दरम्यान या ठिकाणावरून वाहतूक करताना अनेक मासे मृत होतात. त्यामुळेच शासनाने महाराष्ट्रातच मत्स प्रजनकाची वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील दुधना, उस्मानाबाद जिल्ह्यातील मखनी, सोलापूर जिल्ह्यातील उजनी, सातारा जिल्ह्यातील धोम, भंडारा जिल्ह्यातील शिवनी, अमरावती जिल्ह्यातील मांडवा या धरणावरील मत्स्यबीज केंद्रांना भरीव निधी दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शासनाने प्रत्येक धरणाला 3.33 कोटी असे या सहा केंद्रांना एकूण 20 कोटी रुपये दिले आहेत. राज्य मत्स आयुक्तांनी केलेल्या पहिल्या यादीत साताऱ्याचा समावेश नव्हता. मात्र या अहवालाची पुर्णमांडणी राज्य स्तरीय छाननी समिती समोर आल्यानंतर जिल्हयाचे सुपुत्र व पशुसंर्वधन खात्याचे मंत्री ना.महादेव जानकर यांनी पुढाकार घेत धोमचा समावेश करण्याचे आदेश दिले. मंत्री जानकर यांनी घेतलेला पुढाकार अन काही तांत्रीक बाबी यामुळेच धोम जलाशयाच्या मत्स्य केंद्रांला भरीव निधी मिळाल्याची सुत्रांची माहिती आहे.

जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला फार काही चांगले दिवस नाहीत. मात्र जलयुक्त शिवाराच्या कामाचा थोडासा का होईना फायदा या व्यवसायाला झाला आहे. धोम मत्स्यबीज केंद्रांतून प्रतीवर्षी 1.20 कोटी मत्स्य प्रजनन होत आहेत. मात्र शासनाच्या या निधीमुळे यात पाचपटीने वाढ होत तो आकडा 5 कोटींपर्यंत जाणार असल्याचे जिल्हा मत्स्य अधिकारी श्रीकांत वारूंजीकर यांनी सांगितले. शासनाने धोमला दिलेल्या प्राधान्य क्रमामुळे वाईसह जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला अच्छे दिन आल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)