धोत्री गावात सशस्त्र जबरी चोरी

 दोन जण जखमी; 74 हजार लांबविले
 दरोडा असताना जबरी चोरीचा गुन्हा दाखल

जामखेड- जामखेड तालुक्‍यातील धोत्री येथील जाधव वस्तीवर दादासाहेब जाधव यांच्या घरावर चार दरोडेखोरांनी सोमवारी मध्यरात्री हल्ला करून दोन जणांना गंभीा जखमी केले. लाथा व दगडाने दरवाजा उघडून जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांना सत्तूर व लोखंडी हत्याराने मारहाण करून दरोडेखोरांनी 74 हजार रुपये व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आजिनाथ जाधव यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.
पोलीसांनी तातडीने ठसा तज्ज्ञांसह श्‍वानपथकाला पाचारण केले. श्‍वानाने गावापासून दोन किलोमीटरचा मार्ग दाखविला. त्यामुळे हे दरोडेखोर वाहनातून तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. पोलीसांनी अद्यापपर्यंत कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब आजीनाथ जाधव (वय 29 रा. जाधव वस्ती, धोत्री शिवार जामखेड) सोमवारी (27 ऑगस्ट) रात्री कुटुंबीयांसमवेत झोपले असताना चार दरोडेखोरांनी घराच्या दरवाजा लाथा आणि दगड मारून उघडला. तसेच दरोडेखोरांनी दादासाहेब जाधव व त्यांची पत्नी शितल यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. घरातील कपाट उघडून करून त्यातील तीन तोळ्याचे डोरले, गंठन, झुंबर जोडे व तीन विविध कंपन्यांचे मोबाईल असा 74 हजाराचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. या दरम्यान जाधव यांचे वडील आजिनाथ निवृत्ती जाधव व आई नर्मदा यांनी विरोध केला असता त्यांना सत्तूर व लोखंडी पासने डोक्‍यात व छातीवर मारहाण करून गंभीर जखमी करत दरोडेखारांनी पळ काढला.

जखमी आजिनाथ निवृत्ती जाधव व नर्मदा जाधव यांना वस्तीवरील लोकांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आजिनाथ जाधव यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नगर येथे उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. दरोडा प्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरोड्याच्या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाधव वस्ती येथील प्रकार हा दरोडा असताना पोलिसांनी घटनेचे गांभीर्य कमी दाखविण्याच्या मानसिकतेतून हि घटना जबरी चोरी असल्याचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. तालुक्‍यात रोज कुठे ना कुठे चोरी व दरोडेखोरी सारख्या घटना घडतानाही पोलीस चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करून पोलीस नेमकी नागरिकांची मदत करत आहे का चोरांची? असा सवाल नागरिकांमध्ये चर्चा आहे.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात चोऱ्या वाढल्या
गेल्या काही दिवसांपासून जामखेड तालुक्‍यात चोऱ्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. हा तालुका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा मतदारसंघ असूनही चोऱ्यांचे सत्र काही थांबत नाही. येथील पोलीस अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार होत असल्याने पोलीसांचा वचक कमी झाला आहे. त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)