धायरीत लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया

महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

सिंहगड रोड – सिंहगडरोड परिसरातील धायरी येथील नालंदा शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे रस्त्यावर पाण्याचा लोंढे वाहत आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही परिस्थिती असल्यामुळे लाखो लीटर पाणी अक्षरशः वाया जात आहे. त्यामळे येणारे-जाणारे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. लिकेज होणारे पाणी नेमके कुठे लिकेज झाले आहे. हेच न समजल्यामुळे पाणी पुरवठा कर्मचारी पुरते हैराण झाले आहेत. हे पाणी सतत वाहत असल्यामुळे महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. याबाबत महापालिका लोकप्रतिनिधी गप्पच आहेत, असे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर महापालिका अधिकारी यांना विचारणा केली असता, येथील सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता खोदण्यासाठी लागणारे ब्रेकर मशीन उपलब्ध नसल्यामुळे व पाण्याची लाईन रस्त्याखाली कोठे लिकेज आहे हे सापडत नसल्याने या कामात विलंब होत आहे असे सांगितले.

माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण यांनी सांगितले की, येथे काही दिवसांपासून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. परंतु याचे गांभीर्य महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना नाही. धायरीमध्ये बऱ्याच भागात लोकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. परंतु लाखो लीटर पाणी वाया जात आहे. ग्रामपंचायत काळातील कर्मचारीच पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. त्यांना पुरेशी यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्यामुळे त्यांना देखील काम करणे कठीण झाले आहे. या फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. समाविष्ट गावातील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देण्यात महापालिका अपयशी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)