धर्म, राष्ट्र टिकविण्यात महिलांचे योगदान महत्वाचे – अतुल भगरे गुरूजी

बीड  – मी वाढदिवस घरी कधीच करीत नाही, येथील मंडळीच्या भेटीची आस मनात धरून मी आपल्या भेटीसाठी सर्वाच्या विनंतीला मान देत येथे आलो आहे. कोणतेही पद, पुरस्कार मिळणे सोपे असते पण त्या पदाची गरीमा राखण्याची जबाबदारी महत्वाची आहे. मागील केलेल्या कार्याबरोबरच भविष्यातील कार्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी आहे.

आपल्या सर्वाच्या स्नेहामुळेच पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी बसण्याच्या योग आला असून त्यामुळे येणार्‍या काळात अनेकपटीने काम करावे लागेल. सिल्लोडच्या मंडळीने केलेले कार्य हे ईतरांसाठी उर्जा देणारे असून, ज्या भगवान परशुरामांचा आपण जय जयकार करतो तो अधिक व्यापक झाला पाहिजे,

तो राजसत्तेपर्यत पोहोचण्याची गरज असून धर्म, राष्ट्र टिकविण्यात महिलांचे मोठे योगदान असून त्यांचा सन्मान करा. समाजाच्या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक होण्यासाठी संघटनात्मक एैक्याची गरज असल्याचे प्रतिपादन वेदमुर्ती अतुल भगरे गुरूजी यांनी तर येथील घटनात्मक कार्य चांगले असून, ते समाजाच्या गरजू पर्यत पोहचले तर समाज नक्कीच त्यांच्या कार्याची दखल घेत असतो.

ब्राह्मण समाज हा ईतरांना दिशा देणारा असून त्यामुळे निति, आचरण, आहार, धर्म रक्षण, संस्कार आणि संस्कृतीची जपवणूक करण्याची गरज असून हा समाजाचा अलंकार असल्याचे प्रतिपादन व्दाराचार्य महंत अमृतदासजी जोशी यांनी तर परशुराम सेवा संघाच्या माध्यमातून आज पर्यत वधू- वर मेळावे, सार्वजनिक मौंजी, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, रोजगार मेळावे, महिलांचे छोटे मोठया कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचे एैक्य करण्याचा प्रयत्न झाला असून, भविष्यात यापेक्षा दर्जेदार आणि कुटूंबातील सर्वासाठी आवश्यक उपक्रम संघटनापातळीवर मोठ्या प्रमाणात घेतले जातील. समाजात कार्य केलेल्याची दखल ही घेतली जाते त्यामुळे समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन परशुराम सेवा संघाचे प्रातांध्यक्ष अनिलजी मुळे यांनी केले.

परशुराम जयंतीनिमित्त शहरातील अमृत मंगल कार्यालयात भागवताचार्य वेदमुर्ती अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचे व्याख्यान तसेच पंढरपुर येथील श्री विठ्ठल मंदीर विश्‍वस्थ मंडळावर मार्गदर्शक म्हणून निवड आणि भगरे गुरूजींना ब्रह्मरत्न पुरस्कार वितरण व गुरूजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा संघाच्या वतीने त्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  व्यासपिठावर व्दाराचार्य महंत डॉ.अमृतदासजी जोशी, संस्थापक अध्यक्ष अनिलजी मुळे, प्रातांध्यक्ष उल्हास अकोलकर, माजी नगरसेवक प्रा. किशोर काळे, नगरसेवक जगदीश गुरखुदे, राजेंद्र काळे, बीड जिल्हा श्रमिक  मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश वाघमारे,  रविंद्र जोशी, गिरीश जोशी, संघाचे मार्गदर्शक प्रशांत सुलाखे,

जिल्हाध्यक्ष गजानन जोशी, उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी, पुणे येथील प्रसिध्द कवयित्री, साहित्तीक तथा ज्योतीषाशास्त्री सौ.अंजली पोतदार, अ‍ॅड.सुनिता पागे, किर्तनकार सौ.प्रज्ञाताई रामदासी आदींची उपस्थिती होती. प्रारंभी शहरातील सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या कृष्णा मुळे, पत्रकार प्रमोद पुसरेकर, धार्मीक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांचे वृत्तसंकलन करणारे धनंजय गोस्वामी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तर वेदमुर्तीनी वेदपठण व भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर मंगल आगवान अमृता गजानन जोशी, अनिता प्रशांत सुलाखे, रूपाली रमाकांत कुलकर्णी, रत्नमाला बाळासाहेब देशपांडे,ज्योती सतिश सुलाखे, .रेणुका बाबा पाठक, गायत्री नितेश पाठक, सुषमा संदीप कुर्लेकर या सुहासिनींनी भगरे गुरूजी यांचे औक्षवण करून वाढदिवस साजरा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)