धरण परीसरात 1100 बांबूच्या रोपांची लागवड

भामा आसखेड- भामा आसखेड धरण परिसरात सुमारे 1100 बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली. तेरा कोटी वृक्ष लागवड या शासनाच्या योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला आसल्याची माहिती भामा आसखेड धरण प्रशासनाचे के. डी. पांडे यांनी दिली. धरण प्रशासनाचे कर्मचाऱ्यांनी वनखात्याकडून रोपे आणून वृक्षलागवड केली. या कार्यक्रमास करंजविहिरे (ता. खेड) येथील भैरवनाथ विद्यालयाच्या 95 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी भामाआसखेडचे उपविभागिय अधिकारी एस. आर. शर्मा, शाखा अभियंता भारत बेंद्रे, के. डी. पांडे, व्ही. एम. ढोकरे, नरेंद्र धेंडे, भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल भांमरे समवेत शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)