धन्वंतरी’ योजनेला हवाय; 15 कोटींचा “बुस्टर डोस’

वाढीव निधीची आवश्‍यकता : खर्चावर नियंत्रणाची गरज

पिंपरी – आरोग्य विभागाच्या बहुचर्चीत अशा धन्वंतरी योजनेला वाढीव 15 कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी स्थायी समितीसमोर तीन कोटी रुपयांच्या निधी वर्गीणकरणाचा प्रस्तावही मांडला आहे. योजनेतील बीले निकालात काढण्यासाठी आरोग्य विभागाला या वाढीव निधीची आवश्‍यकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने धन्वंतरी स्वास्थ्य योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू केली. यासाठी महापालिका आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती नेमली आहे. या योजनेमध्ये महापालिकेच्या सेवेतील 6 हजार 890 अधिकारी, कर्मचारी तसेच 883 सेवानिवृत्त असा एकूण 7 हजार 773 कर्मचा-यांना योजनेत समाविष्ट करुन घेण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील 120 खाजगी रुग्णालयांशी करारनामे केले आहेत. यानुसार कर्माच्या-यांच्या वैद्यकीय खर्चाचा काही वाटा महापालिका भरते आहे. मात्र योजनेत दिल्या जाणाऱ्या खर्चावर कोणतेही नियंत्रण नसल्याने या योजनेला सुरुवातीपासूनच वाढीव निधीचे सलाईन लावण्यात येत आहे.

महापालिकेच्या लेखा विभागाने 2016 मध्ये केलेल्या लेखापरिक्षणानुसार योजना जरी चांगली असली तरी योजनेतील खर्चावर कोणतेही नियंत्रण नाही. या खऱ्चावर नियंत्रण ठेवले नाही तर योजना बंद करावी लागेल अशा स्पष्ट सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या होत्या.या योजनेसाठी विशेष अशा तज्ज्ञ डॉक्‍टरांची समिती तयार करा जी या स्वतः हॉस्पीटलला भेटी देईल, तसेच मागणी केलेल्या आजारानुसार तेवढा खर्च करणे गरजेचे आहे का, कोणत्या उपचारावर किती खर्च व्हावा याचे निकष ठरवावेत, छोट्या आजारालाही किती खर्च करावा याचे नियंत्रण असावे अशा सुचना यावेळी करण्यात आल्या होत्या.

या योजनेत जे कर्मच्या-यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती मागे 20 लाख रुपये दिले जातात. त्यामुळे अगदी छोट्या अजारालाही भरमसाठ खर्चाची बीले कर्मचारी सादर करत असल्याचेही लेखापरीक्षणात समोर आले होत. त्यानुसार आर्थिकवर्ष 2018-19 मध्येही नियोजीत निधी 9 कोटीपेक्षा ही वाढीव 15 कोटी वाढीव निधीची मागणी 8 ऑगस्ट रोजी लेखापरिक्षण विभागाकडे केली आहे.

मार्च 2019 पर्यंत योजनेसाठी 15 कोटींच्या निधीची गरज आहे. गेल्यावर्षी दहा कोची मंजीर झाले होते. मात्र बीले थकल्याने सुमारे 8 कोटी 60 लाख रुपयांचा धनवंतरीचा निधी वापराविना माघारी गेला. तर यावर्षीचे 9 कोटींचा निधी संपला त्यामुळे वाढीव निधी असा दोन्ही मिळून 15 कोटींची गरज धन्वंतरी योजनेला आहे.
                                                            – डॉ. अनिल रॉय,
आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)