धनगर समाजाचा सरकारला “अंतिम इशारा’

उद्यापासून राज्यभर आंदोलन : मंत्री, आमदारांवरही आरोप

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.30 – आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला असताना दुसरीकडे धनगर समाजानेदेखील एल्गार पुकारला आहे. 1 ऑगस्टपासून धनगर आरक्षणाच्या लढ्याला पुण्यातून सुरूवात करण्यात येणार असल्याचे धनगर समाज आंदोलनाचे नेते उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. यासंदर्भात सोमवारी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समाजाच्यावतीने शासनावर विविध आरोप करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील दीड कोटी धनगर समाजाला गेल्या 70 वर्षांपासून आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. आस्तित्वात नसलेली धनगड आदिवासी जमात उभी करुन समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप केला. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी जातपडताळणी समिती, अदिवासी मंत्रालयाकडून माहिती अधिकारात महिती घेतली असता, एकही “धनगड’ आढळून आला नाही. दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात मिळून 93 हजार “धनगड’, तर एकूण 19 लाख 50 हजार बोगस आदिवासी दाखविले आहेत. यावर अदिवासी समाजाने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारे 9.5 टक्के आमदार कोटा तर 30 टक्के अनुदान आणि 30 टक्के नोकऱ्या या इतर समाजाच्या बोगसगिरी करुन मिळविल्या आहेत. त्यामुळे सर्व अदिवासी मंत्री, आमदार व बोगस लाभधारक व नोकरीधारकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीसुद्धा यावेळी जानकर यांनी केली.

जानकर म्हणाले, “काही वर्षांपूर्वी एका प्रश्‍नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात “धनगर’ आणि “धनगड’ या भिन्न जाती आहेत. त्यांच्या चालीरिती-रुढी -परंपरा देवदेवता वेगळ्या असल्याची खोटी माहिती दिली. तर, ‘मुंबई उच्च न्यायालयात मधू शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरकारकडून आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी धनगर आणि धनगड या भिन्न जाती आहेत, अशी माहिती सादर केली आहे. त्यामुळे या दोघांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.

समस्त धनगर समाजाच्यावतीने आता सरकाराला अंतिम इशारा असून सरकारने राज्यात एकतरी “धनगड’ दाखवावा, अन्यथा 1 सप्टेंबर 2018 पूर्वी महाराष्ट्रातील धनगर समाजाला “एसटी’चा प्रवर्गाचा दाखला द्यावा, अशी मागणी जानकर यांनी केली. या लढ्याला आता 1 ऑगस्टपासून सुरूवात होणार असून त्यासंदर्भात समाजाची बैठक कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे होणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)