धनकवडीत भिंत पडून घरात महिला अडकली

धनकवडीत भिंत पडून घरात महिला अडकली
धनकवडीमध्ये पावसाने एका इमारतीची भिंत दुसऱ्या इमारतीच्या सदनिकेवर पडली. यामुळे घरामध्ये एक महिला अडकून पडली होती. तीला अग्निशमन दलाने खिडकीचे गज कापून बाहेर काढले. ही घटना धनकवडी येथे पहाटे घडली. धनकवडी गावठाणातील सावकर चौकात एका तीन मजली इमारत आहे. तीचा पाया दगडाचा असून लगत संडास व बाथरुम बांधलेले आहे. तर शेजारीच तीन ते चार फुटावर दुसरी इमारत आहे. पावसाचे पाणी मुसल्याने इमारतीचा दगडी पाया दुसऱ्या इमारतीच्या तळघरातील सदनिकेवर पडला. हा सर्व राडारोडा सदनिकेच्या दरवाजावर पडल्याने आतमध्ये एक महिला अडकून पडली. कात्रज अग्निशमन केंद्राच्या जवानांनी खिडकीचे गज कापून तीची सुटका केली. तांडेल संजीवन ढवळे, फायरमन मांडवकर,पाटील, वसंत भिलारे तर देवदूतच्या शिर्के , वाघमोडे आणी जगताप यांच्या पथकाने हे काम केले.

 तळमजल्यावर असलेली ही भिंत कोसळण्याची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे येथील कुटूंबांना दुसरीकडे हलवण्यात आले होते. ही भींत 16 फुट उंच व 50 फुट लांब होती. ही भिंत कमकुवत झाल्याने पुर्नबांधणी करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र पावसामुळे हे काम रखडले होते. अखे ही भिंत पडली. भिंतीच्या राडारोडयाखाली एक दुचाकीही अडकली होती. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)