धक्कादायक ! मध्य प्रदेशात उमेदवारांच्या छातीवर लिहिले ‘एससी’, ‘एसटी’

धार : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आरोग्य तपासणीदरम्यानचा एक  धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस हवालदार पदासाठी निवड करण्यात आलेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांच्या छातीवरच ‘एससी’, ‘एसटी’ असे लिहिण्यात आल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.

धार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी आरक्षित जागांसाठी भरतीचे अभियान चालवले गेले. याच दरम्यान निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या ओळखीसाठी जिल्हा रुग्णालयाने मात्र एक वेगळीच पद्धत अवलंबली. तपासणीदरम्यान आरक्षित वर्गाच्या उमेदवारांच्या थेट छातीवरच त्यांचा वर्ग नमूद करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)