नवी दिल्ली- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील भोंगळ कारभार उघड झाला आहे. आंध्र प्रदेशातल्या मनरेगा योजनेत नोंद असलेल्या जवळपास 89 लाख लोकांचा आधार डेटा आंध्र सरकारकडून सार्वजनिक केल्याची माहिती समोर येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी वृत्त दिले आहे.
26 एप्रिल रोजी सकाळी हैदराबादेतल्या इंटरनेट सुरक्षा संशोधक कोडाली श्रीनिवास यांनी आधार नंबर लीक झाल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेचच साइटवरून त्या नंबरांना ब्लर करण्यात आले. आंध्र प्रदेशात बेनिफिट डिस्बर्समेंट पोर्टल(बीडीपी) मनरेगाशी संबंधित लोकांची मजुरी, सोशल सिक्युरिटीसह पेन्शनचा हिशेब ठेवते. राज्यातील 89 लाख 38 हजार 138 लोकांनी स्वतःचा आधार नंबर या योजनेबरोबर जोडला आहे. या सर्व लोकांचे नाव, गावाचे नाव, जॉब कार्ड नंबर, आधार नंबर वेबसाइटवर टाकण्यात आले आहेत. जवळपास या योजनेत 1 कोटी 2 लाख लोकांनी सहभाग नोंदवला आहे.
दरम्यान, राज्याचे प्रधान सचिव विजयानंद यांनी हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून होणा-या डेटा लीक प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनाही या गोष्टीची माहिती नाही. परंतु आधार डेटा बीडीपीवर उपस्थित आहे. विजयानंद यांच्या मते, राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशमध्ये सायबर सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटरही सुरुवात करण्यात आली आहे. एका आठवड्यात सर्वकाही सुरळीत होणार असून, आम्ही पूर्णतः सावधानता बाळगली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा