द ग्रेट हिमालयन अल्ट्रा सायकल शर्यत उद्यापासून रंगणार

पुणे- भारतातील सर्वोत्तम रॅम क्‍वालिफायर, द डेक्‍कन क्‍लिफहॅंगर आणि 1750 किमी लांबीच्या अल्ट्रा स्पाइस रेस यांच्यातर्फे द ग्रेट हिमालयन अल्ट्रा सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत एक ते तीन सप्टेंबर दरम्यान लेह येथे पार पडणार आहे.

ग्रेट हिमालयन अल्ट्रा सायकल शर्यत ही जगातील सर्वाधिक उंच्च स्थानावरील अल्ट्रा सायकल शर्यत आहे. 3500 मीटर उंची असलेल्या जगातील सर्वाधिक उंच पासेस असलेल्या लेह, लडाख येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. रॅम क्‍वालिफायर अल्ट्रा रेसमध्ये आजपर्यंत झालेल्या शर्यतींपेक्षा अधिक उंचीवर ही शर्यत होत असून ही स्पर्धा वैयक्‍तिक व सांघिक गटात होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धकांना हिमालयातील खडतर मार्ग व 600 कि.मीचा टप्पा पार करायचा असून यामध्ये सपोर्ट व्हेईकल आणि क्रू असणे आवश्‍यक आहे. शर्यतीची सुरुवात लेह येथून होऊन पुढे शर्यतीचा मार्ग जम्मू-काश्‍मीरमधील लडाख आणि कारगिल येथील नेत्रदीपक हिमालय पर्वतश्रेणीतून जाणाऱ्या एनएच1 या मार्गावरून असेल. हा मार्ग पुढे इन्ससच्या पठाराच्या खाली झान्स्कर येथे उतरतो आणि एका नयनरम्य संगमावर सिंधू नदीचा रंग बदलतो जो स्पष्टपणे या मार्गावरून दिसतो. पुढे कारगिलकडे जाणारा शर्यतीतील उताराचा टप्पा सुरू होतो व नंतर शर्यतीतील सर्वाधिक उंचीवरील मार्ग येतो. सर्वात कमी उंचीचा कारगिलचा 2600 मीटरचा टप्पा पार करून आता स्पर्धकांना सर्वाधिक उंचीचा 4100 मीटरचा टप्पा पार करायचा असतो.

पाचव्या मालिकेत द डेक्‍कन क्‍लिफहॅंगर स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणारा मुंबईचा कबीर राचुरे, सैन्यातील एव्हरेस्टवीर विशाल अहलावत, सुमित पाटील,अमित समर्थ यांसाऱखे दिग्गज सायकलपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चेसिंग हिमालयाजचे वसिम बारी, रोव्हर्स डेनच्या ग्रीष्मा सोले, लडाख ऑक्‍सिजन मॉन विकी नियाझ, लडाख ऑर्गेनिक फार्मर्स फाउंडेशनचे संस्थापक झुबीर अहमद व ट्रंप स्पोर्टस्‌ वेअरचे संजन राणा यांचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)