द्युती चंदला दुसरे रौप्यपदक

जकार्ता: अव्वल धावपटू द्युती चंदने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई करताना दुहेरी यशाची नोंद केली. द्युती चंदचे या स्पर्धेतील हे दुसरे रौप्यपदक ठरले. द्युतीने याआधी महिलांच्या 100 मीटर शर्यतीतही रौप्यपदकाची कमाई केली होती. द्युतीने 23.20 सेकंदांत अंतिम रेषा पार करीत रौप्यपदकाची निश्‍चिती केली.

बहारीनच्या एडिडिआँग एडिआँगने 22.96 सेकंदांत अंतिम रेषा पार करताना सुवर्णपदक संपादन केले. तर चीनच्या वेई योंगली हिने 23.27 सेकंदांत शर्यत पूर्ण करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली. लिंगचाचणी प्रकरणात बंदी घालण्यात आल्यामुळे द्युतीला 2014 आशियाई स्पर्धा, तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. परंतु तिने आंतरराष्ट्रीय लवादापर्यंत लढा देऊन ही बंदी उठविण्यात यश मिळविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुहेरी पदकांच्या या कामगिरीमुळे द्युतीने भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषाच्या मालिकेत स्थान मिळविले आहे. उषाने 1986 सेऊल आशियाई स्पर्धेत 200 मी., 400 मी., 400 मी. अडथळा शर्यत व 4 बाय 400 मी. रीले या शर्यती जिंकून इतिहास घडविला होता. ज्योतिर्मय सिकदरनेही 1998 बॅंकॉक स्पर्धेत 800 व 1500 मीटर शर्यती, जिंकल्या होत्या. तसेच सुनीता राणीने 2002 बुसान स्पर्धेत 1500 मी. व 5000 मी. शर्यतीत दोन पदके जिंकली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)