दौंड तालुक्‍यात चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर

दौंड- दौंड तालुक्‍यातील रोटी, वासुंदे, देऊळगाव राजे, नाथाची वाडी या चार ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. या पार्श्वभूमीवर आज (दि. 27) दौंड तहसीलदार कचेरी येथे मतमोजणी झाली. यावेळी निवडणुकीचे निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
रोटी गावात सरपंच पदासाठी दोन उमेदवारांत थेट लढत झाली. रोटी गावच्या सरपंचपदी दिलीप नारायण शितोळे यांची निवड झाली, त्यांना 460 मते मिळाली. त्यांनी विरोधी पॅनेलचे उमेदवार शहाजी शितोळे (396 मते) यांचा पराभव केला.
वासुंदे गावात सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. सरपंच पदासाठी थेट लढत निलेश भोईटे (664 मते ) विरुद्ध दत्तात्रय लोंढे (576 मते) यांच्यात लढत झाली. या लढतीत नीलेश भोईटे यांनी विजय मिळवला.
देऊळगाव राजे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी तीन महिला उमेदवार रिंगणात होत्या. यात सरपंच पदासाठी स्वाती अमित गिरमकर यांनी 996 मते मिळवून विजय मिळवला आहे, तर त्यांच्या विरोधी उमेदवार सुभद्रा अर्जुन गिरमकर यांना 704 मते, तर सारिका सतिश आवचर यांना 513 मते मिळाली.
नाथाची वाडी येथे सरपंच पदासाठीच्या निवडणुकीत सारिका अनिल चोरमले यांनी 1158 मते मिळवून विजय मिळवला आहे. त्यांच्या विरोधी उमेदवार विद्या दिगंबर ठोंबरे यांना 772 मते मिळाली. निवडणुक निकालानंतर विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)