दौंडमध्ये पालखीतळ विकासकामे धिम्या गतीने

यवत- संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असताना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी राज्य सरकारने त्या गावांच्या पालखीतळाचा विकास करण्यासाठी प्रत्येक पालखीतळासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. परंतु गेली दोन वर्षांपासून ही विकासाची कामे प्रत्येक्षात पूर्ण न होता कागदावरच असल्याचे दिसत आहे. तर सुरू असलेली कामे धिम्या गतीने सुरू असून पालखी सोहळा दि.5 जुलै पासून सुरू होणार असल्याने सव्वा महिन्याच्या कालावधीत पालखीतळाची मंजूर विकास कामे पूर्ण होणार नसल्याने वारकऱ्यांना पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे.
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्‍यातील यवत, वरवंड या पालखी सोहळा मुक्कामी ठिकाणच्या सुरू असलेल्या कामाची बुधवारी (दि.30) पाहणी केली. धिम्या सुरू असलेल्या कामांमुळे म्हैसकर यांनी नाराजी व्यक्त करीत कामाबाबत इतर अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
राज्य सरकारने संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामी पालखीतळांच्या ठिकाणी वारकरी भक्तांना सुख सुविधा मिळावी. यासाठी कोट्यवधीच्या निधीची तरतूद गेल्या दोन वर्षांपूर्वी केली आहे. पालखीतळाची अनेकवेळा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. परंतु हे पालखीतळ विकासाचे संपूर्ण काम या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मिळणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धिम्या गतीने सुरू असलेल्या कामांमुळे सव्वा महिन्यात संपूर्ण काम होणे शक्‍य नाही. हे संपूर्ण काम यावर्षी होणार नसल्याच्या शक्‍यतेने संबंधित अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
यवत (ता. दौंड) येथे वारकऱ्यांसाठी भक्त निवासाचे बांधकाम सुरू असून ते अर्धवट अवस्थेत आहे. हे काम जून महिन्याअखेरीस होणे गरजेचे असताना या कामाला अजून चार ते पाच महिने लागण्याची शक्‍यता आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी या कामाची पाहणी करीत वेळेत काम होणार नसल्याने अधिकारी वर्गाला जाब विचारत फैलावर घेत नाराजी व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांनी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आदी कामे होणे गरजेचे असल्याचे आयुक्त म्हैसकर यांच्या निदर्शनात आणून दिले. यावेळी दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी उत्तम चव्हाण, बिराजदार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, गटविकास अधिकारी गणेश मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अनिल बढे, यवतच्या सरपंच रझिया तांबोळी, उपसरपंच सोमनाथ कऱ्हे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)