दौंडच्या पूर्व भागात गहू काढणीला वेग

मशीनच्या सहाय्याने झटपट मळणी

रावणगाव- दौंडच्या पूर्व भागात गहू काढणीला आणि मळणीला वेग आला आहे. या परिसरातील गव्हाची मळणीची कामं अंतिम टप्यात आहेत.

दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागातील रावणगाव, मळद, नंदादेवी, बोरिबेल, खडकी, जिरेगाव, कौठडी, भोळोबावाडी परिसरातील गहू काढणी आणि मळणी सध्या जोरात सुरु आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक मळणी यंत्राला फाटा देत पंजाब, हरियाणा राज्यातून आलेल्या मशीनच्या सहाय्याने एकरी साधारण दोन ते तीन हजार रुपये दर देऊन गव्हाची झटपट मळणी करून घेण्यावर भर दिला आहे. तर, ज्या शेतकऱ्यांनी उसाच्या शेतात गव्हाचे पीक घेतले आहे, असे शेतकरी पारंपरिक मळणी यंत्राच्या सहाय्याने गव्हाची मळणी करीत आहेत.
गव्हाला पोषक वातावरण लाभल्याने तसेच गहू पिकावर कसलाही रोग न पडल्याने पीक सर्वत्र जोमात आले आहे. परंतु, पाण्याअभावी यावर्षी गव्हाचे क्षेत्र मात्र अतिशय कमी असून एकरी साधारण 15 ते 18 पोती उत्पादन मिळत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.